S M L

अमिताभ बच्चन यांनी उचलला २०० शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार

शेतकरी आत्महत्या का करत आहेत आणि त्यांना एवढं कर्ज का घ्यावं लागतं या गोष्टींकडे कानाडोळा करुन चालणार नाही

Updated On: Aug 29, 2018 10:15 AM IST

अमिताभ बच्चन यांनी उचलला २०० शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार

मुंबई, २९ ऑगस्ट- दुष्काळ आणि त्यात डोक्यावर कर्ज यामुळे राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण आता त्यांच्या मदतीला चक्क महानायकच आला आहे. अमिताभ बच्चन २०० शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम ते स्वतः भरणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या कार्यामुळे ते पडद्यावरचेच नाही तर पडद्यामागचेही नायक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, २०० शेतकऱ्यांच्या कर्जाची एकूण रक्कम १ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. बिग बींनी ही सर्व रक्कम कर्जाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरले. कौन बनेगा करोडपती या रिअलिटी शोचे १० वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच या शोशी निगडीत पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली. या पत्रकार परिषदेतच बच्चन यांनी २०० शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करत, ‘शेतकरी आत्महत्या का करत आहेत आणि त्यांना एवढं कर्ज का घ्यावं लागतं या गोष्टींकडे कानाडोळा करुन चालणार नाही,’ असेही ते म्हणाले. अमिताभ बच्चन यांनी याआधीही ५० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले होते.

आपल्या दानधर्माबद्दल बच्चन यांना फार बोललेलं आवडत नाही. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मनापासून समाजासाठी काही तरी करायला प्रवृत्त करते, या प्रश्नाचं उत्तर देताना बिग बी म्हणाले की, 'अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे मी प्रवृत्त होतो. मी पोलीओमुक्त भारताच्या कॅम्पेनमध्ये अनेक वर्ष सक्रीय होतो. सुदैवाने भारत आज पोलीओमुक्त आहे. सध्या मी टीबी आणि हॅपीटायटीस बी या आजारांबद्दल जनजागृती करत आहे. मला टीबी आणि हॅपीटायटीस बी हे दोन्ही आजार झाले आहेत. याबद्दल सांगताना मला अजिबात लाज वाटत नाही. फक्त मला त्यानंतर मिळणारी सहानुभूती नको असते, म्हणून याबद्दल मी फारसं बोलत नाही. पण लोकांनी योग्य वेळेत सर्व चाचणी करुन घ्यावी असे मला वाटते.'



एवढंच बोलून ते थांबले नाहीत, आपल्या आजाराबद्दल बोलताना ते म्हणाले की, 'जेव्हा कुली सिनेमाच्या सेटवर माझा अपघात झाला होता. मला रक्ताची फार गरज होती. तेव्हा सुमारे २०० लोकांनी मला रक्त दिलं. यातील एकाला हॅपीटायटीस बी हा आजार होता. २००६-०७ मध्ये माझं यकृत ७५ टक्के निकामी झाल्याचे कळले. आता मी फक्त २५ टक्के यकृतावर काम करतोय. तपासणी करण्याची मला कधी गरजच वाटली नाही. मी या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यामुळे याचं निदान व्हायला फार उशीर झाला.'

VIDEO : न चूकता विठ्ठलाला नतमस्तक होणारा 'तेजा'काळाच्या पडद्याआड!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 09:27 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close