Home /News /entertainment /

त्या शीख दंगलीला बिग बी होते जबाबदार? 11 वर्षांपूर्वीचं पत्र पुन्हा होतंय व्हायरल

त्या शीख दंगलीला बिग बी होते जबाबदार? 11 वर्षांपूर्वीचं पत्र पुन्हा होतंय व्हायरल

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

त्यावेळी एक पत्र लिहून स्वत:वरील सर्व आरोप बिग बींनी फेटाळले होते. त्यावेळचं हे पत्र आज 10 वर्षानंतर पुन्हा एका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    मुंबई 21 मे: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दिल्लीच्या गुरुद्वारा रकब गंज साहिब येथे कोव्हिड केअर सेंटर उभारण्यासाठी 2 कोटी रुपयांची मदत केली होती. सुरुवातीला ही मदत घेण्यास अनेकांनी नकार दिला होता. कारण त्यांच्यावर शीख हत्याकांडाला प्रोत्साहन दिल्याचे आरोप करण्यात आले होते. खरं तर असेच काहीसे आरोप 2011 साली देखील करण्यात आले होते. (Amitabh Bachchan old letter viral) मात्र त्यावेळी एक पत्र लिहून स्वत:वरील सर्व आरोप बिग बींनी फेटाळले होते. त्यावेळचं हे पत्र आज 10 वर्षानंतर पुन्हा एका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमिताभ बच्चन यांनी 2011 साली अकाल तख्त साहिबच्या जत्थेदारांना हे पत्र पाठवलं होतं. यामध्ये त्यांनी त्यांच्यावर केले जाणारे आरोप फेटाळून लावले होते. मी कधीही शीख हत्याकांडाला पाठिंबा दिला नाही. मी कोणाविरोधातही भडकाऊ भाषणं केली नाहीत. कदाचित तुम्हाला कोणीतरी चूकीची माहिती दिली किंवा तुमचा गैरसमज झाला आहे. असं स्पष्टीकरण देत बिग बींनी आपण निर्दोष असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. हे पत्र मुंबईत राहणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य गुरिंदरसिंग बावा यांच्यामार्फत पाठवण्यात आलं होतं. अनुराग कश्यपची मुलगी पडली प्रेमात; सांगितला आयुष्यातील पहिल्या Kiss चा अनुभव 1984 साली झालेल्या शीख हत्याकांडाचा संबंध सध्या बिग बींशी जोडला जात आहे. यामुळं अनेक जण त्यांच्यावर टीका देखील करत आहेत. या आरोपांमुळंच त्यांची मदत देखील नाकारण्यात आली होती. बिग बी आणि गांधी कुटुंबीयांचे फार जवळचे संबंध आहेत. त्यांच्यात मैत्रीचं नातं आहे. दोन्ही कुटुंबांनी प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांना कायम मदतीचा हात पुढे केला. त्यामुळंच त्यांच्यावर अनेकदा असे आरोप केले जातात असं म्हटलं जातं. मात्र अमिताभ यांनी पत्रात लिहिलेल्या मजकुरानुसार त्यांनी कधीही कुठल्याही धर्मावर किंवा जातींवर टीका केली नाही. अन् कधीही करणार नाही. त्यांचं हे पत्र सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Viral photo

    पुढील बातम्या