मुंबई, 12 जानेवारी : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन अजूनही दिवसातील 16 तास काम करतात. त्यामुळेच ते तरुणांसाठी आणि आपल्या समवयीन ज्येष्ठ नागरिकांसाठीही प्रेरणास्रोत बनले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक ब्रँडच्या जाहिरातीदेखील आहेत. आता अशाच एका जाहिरातीमुळे ते अडचणीत सापडले आहेत. बच्चन यांचा लोकप्रिय क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' (केबीसी) आता बंद झाला आहे. केबीसी संपल्यानंतरही ते चर्चेत आले आहेत. केबीसीच्या सेटवर केलेली एक जाहिरात याला कारणीभूत आहे. केबीसीच्या सेटवर त्यांनी 'ब्रिटानिया मिल्क बिकिज'ची जाहिरात केली होती. न्यूट्रिशन अॅडव्होकसी इन पब्लिक इंटरेस्टनं (NAPI) या जाहिरातीविरोधात अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली आहे.
केबीसी ज्युनिअर आणि ब्रिटानिया मिल्क बिकिज यांनी टायअप केलं होतं. त्यामुळे शो दरम्यान अमिताभ बच्चन यांना वेळोवेळी या बिस्किटची जाहिरात करावी लागली. "प्रत्येक आईला आपल्या मुलांना जेवण खाऊ घालताना अडचणीचा सामना करावा लागतो. पण, आता त्यांच्या समस्येवर उपाय सापडला आहे ज्याचं नाव आहे, Britannia Milk Bikiz. या बिस्किटात गव्हाची आणि दुधाची पोषणमूल्यं आहेत. ती घरच्या जेवणाइतकीच आरोग्यदायी आहेत," असं अमिताभ बच्चन म्हणताना दिसायचे. नापीनं (NAPI) या जाहिरातीवर प्रश्न उपस्थित केला आहे. हे उत्पादन जागतिक आरोग्य संघटनेच्या सकस आहाराचे निकष पूर्ण करत नाही. त्यामुळे ही जाहिरात दिशाभूल करणारी असल्याचं नापीचं म्हणणं आहे.
हेही वाचा - अभिषेकसोबत लग्नासाठी जया बच्चन यांनी करिष्मासमोर ठेवलेली 'ही' अट; अभिनेत्रीने नकार देताच तुटलं नातं
Amitabh Bachchan is selling Britannia Milk Bikis biscuits for childern. He is mis-selling, and playing with kids' nutrition. Read this full letter from doctors, criticising the product, and the misleading promotion by Bachchan. pic.twitter.com/smFGlmpZmY
— Sandeep Manudhane (@sandeep_PT) January 11, 2023
अमिताभ बच्चन यांच्यावर घातक उत्पादनांचा प्रचार केल्याचा आरोप होत आहे. नापीनं 28 डिसेंबर 2022 रोजी बच्चन यांना एक नोटीस पाठवली आहे. अद्याप त्यांनी या नोटीसला उत्तर दिलेलं नाही.
अमिताभ बच्चन यांच्यावर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही चुकीच्या उत्पादनाची जाहिरात केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत. त्यांनी मॅगीची जाहिरात केली होती. काही काळापूर्वी मॅगीच्या गुणवत्तेबाबत झालेल्या वादामुळे अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप झाले होते. याशिवाय सॉफ्ट ड्रिंक ब्रँड पेप्सीची जाहिरात करून अमिताभ अडचणीत आले होते. या पेयामध्ये कीटकनाशकांचा वापर केला जात असून ते आरोग्यास हानिकारक आहे, असे आरोप झाले होते. या प्रकरणी पेप्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चॉकलेट ब्रँड कॅडबरीची जाहिरात करून बिग बींना टीका सहन करावी लागली होती. पान मसाला ब्रँड कमला पसंदची जाहिरातही केल्यामुळेही त्यांच्यावर टीका झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News