बिग बी आजारी, कण्याला आणि डाव्या हाताला दुखापत

बिग बी आजारी, कण्याला आणि डाव्या हाताला दुखापत

बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत सध्या बरी नाहीये. त्यांच्या कण्याला आणि डाव्या हाताला दुखापत झालीये. खुद्द अमिताभ यांनीच ही माहिती त्यांच्या ब्लॉगवर दिलीये.

  • Share this:

28 जानेवारी : बिग बी अमिताभ बच्चन यांची तब्येत सध्या बरी नाहीये. त्यांच्या कण्याला आणि डाव्या हाताला दुखापत झालीये.  खुद्द अमिताभ यांनीच ही माहिती त्यांच्या ब्लॉगवर दिलीये.

'शस्त्रक्रिया करायची की नाही, यावर डॉक्टरांचा विचार सुरू आहे. मला दात घासताना, खाताना, लॅपटॉपवर टाईप करताना खूप त्रास होतोय. सर्व क्रिया उजव्या हातानं कराव्या लागतायेत,' असं बिग बींनी म्हटलंय. अमिताभ बच्चन हे डावरे आहेत. त्यामुळे आता त्यांना उजवा हात वापरावा लागतो.

आपल्यावर औषधोपचारही मर्यादेत करावे लागतात, असं बिग बींनी म्हटलंय. 1983मध्ये 'कुली'च्या सेटवर त्यांचा अपघात झाला होता. अगदी जीवनमरणाची लढाई लढून ते वाचले होते. बिग बी आता 75 वर्षांचे आहेत. पण ते ज्या पद्धतीनं आणि वेगानं शूट करतात, ते कुणाही तरुणाला लाजवेल असंच आहे.

ब्लॉगवर काय म्हणाले बिग बी ?

- माझ्या कण्याला आधीही दुखापत झाली होती. मग टीबीमुळे L2 -L5 ला इजा झाली होती. हे दुखणं आता वाढलंय. अशा गंभीर दुखापतीचे परिणामही तसेच असतात. पलंगातून उठण्यासाठी खूप वेळ लागतो. साधं बाथरुममध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागतोय. गोळ्या घेतल्याशिवाय काहीच शक्य होत नाहीये. ना धड बसता येत, ना पलंगावर पडता येत, ना चालता येत. आता ब्लॉग लिहितानाही मला खूप त्रास होतोय, कारण ताठ बसणं शक्य होत नाहीये.

यात भर म्हणजे डाव्या खांद्याचं दुखणं. खांद्यामधल्या 'रोटर कप'ला इजा झालीये. सतत काम करणे आणि अॅक्शन सीन्समुळे हे दुखणं वाढलंय. मी डावखुरा असल्यामुळे कामाचा वेग मंदावलाय. 'लेफ्टी'पासून 'राईटी' बनण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. खाणे, दात घासणे, कपडे घालणे, व्यायाम करणे...सगळं उजव्या हातानं करण्याचा मी प्रयत्न करतोय. दोन्ही मनगटंही खूप दुखतायेत. लिहिताना किंवा टाईप करताना खूप त्रास होतोय.

कोणती औषधं घ्यायची, शस्त्रक्रिया करायची का, यावर रोज चर्चा सुरू असते. मी सगळी पथ्यं पाळतो. त्यामुळे त्रास थोडा कमी होतो. पण या औषधांचा एक वाईट परिणामही होतो. आधीच खूप पथ्यं असलेल्या माझ्या खाण्यावर आणखी बंधनं येतात. पण आयुष्य सुरू राहतं, कामही सुरू आहे. आणि फक्त शारीरिक त्रास नाही, पण मानसिक त्रासही खूप होतोय. शक्य तेवढा लढा मी देतोय.

First published: January 28, 2018, 10:47 AM IST

ताज्या बातम्या