'बाहुबली'नंतर येतोय 'महाभारत',बिग बी साकारणार भीष्म पितामह

महाबजेट असणाऱ्या या सिनेमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार दिसणार आहेत. यामध्ये बॉलिवूडचे शहनेशहा बिग बी अमिताभ बच्चन भीष्म पितामहची भूमिका साकारताना दिसतील

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2017 04:05 PM IST

'बाहुबली'नंतर येतोय 'महाभारत',बिग बी साकारणार भीष्म पितामह

01 एप्रिल : 'बाहुलबली - द कन्ल्यूजन' सर्वत्र प्रदर्शित झाल्यानंतर साउथ फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली अजून एका धमाकेदार सिनेमाची तयारी करत आहेत. महाभारतावर आधारित हा सिनेमा असून सिनेमाच बजेट तितकचं वजनदार म्हणजेच 700 करोड इतकं असणार आहे.

एवढचं नव्हे तर महाबजेट असणाऱ्या या सिनेमात बॉलिवूडचे अनेक दिग्गज स्टार दिसणार आहेत. यामध्ये बॉलिवूडचे शहनेशहा बिग बी अमिताभ बच्चन भीष्म पितामहची भूमिका साकारताना दिसतील.

'महाभारत' या विषयावर सिनेमा बनवण्यासाठी राजामौली यांनी अनेक योजना सुद्धा केल्या होत्या. अजूनही या सिनेमात कोणते कलाकार काम करतील हे ठरलं नसून आमिर खान, रजनीकांत तसंच अभिनेता मोहनलाल एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे.

राजामौली या येत्या काही दिवसात सिनेमाची अधिकृत घोषणा करतील. ऐंशीच्या दशकात बीआर चोपडा यांच्या महाभारत या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली होती. मुकेश खन्ना यांनी यी मालिकेत भीष्म पितामह ची भुमिका साकारुन एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनात उमठवली होती.

2012 मध्ये आलेल्या महाभारत एनिमेशन सिनेमात बिग बी यांनी भीष्मच्या भूमिकेसाठी डबिंगसुद्धा केलं होतं. मात्र, आता अमिताभ बच्चन भीष्म पितामहची भूमिका कितपत प्रेक्षकांना पसंत पडणार हे पाहावं लागेल.

Loading...

बिगबजेट असेलेल्या हा सिनेमाच चित्रिकरण हिंदी, मलयालम, तमिल, तेलुगु आणि इंग्रजी भाषांमध्ये होणार आहे. सिनेमाच चित्रिकरण 2018 च्या अखेरीस सुरू होईल आणि 2020 ला सर्वत्र प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...