25 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी बिटकॉईनमुळे मालामाल झालेले अभिनेते अमिताभ बच्चन यांना आता 640.3 कोटींचा फटका बसला आहे. बिटकॉईनच्या चढ-उतारामुळे अमिताभ बच्चन यांनी गुंतवणूक केलेले पैसे अचानक नामशेष झाले आहे.
अमिताभ यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीत त्यांचा 1 टक्का शेअर होता. बिटकॉईनमध्ये वाढ झाल्याने त्यांना अचानक 10 डॉलर म्हणजेच 640.3 कोटींचा फायदा झाला होता पण पुन्हा अचानक बिटकॉईनचे भाव पडल्यामुळे त्यांना फायद्या ऐवजी आता मोठा फटकाच बसला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मेरिडियन टेकमध्ये आपल्या होल्डिंगच्या बदल्यात, बच्चन कुटुंबीयाला मालमत्ता खरेदी केल्यानंतर लॉग्नफिनचे 2,50,000 शेअर्स मिळाले होते. पण लॉन्गफिन कंपनीची स्टॉक किंमत 70 डॉलर इतकी झाल्यावर या किंमतीनुसार बच्चन कुटुंबीयांची मालमत्ता किंमत 1.75 कोटी डॉलर इतकी झाली. जी चालू विनिमय दरानुसार 114 कोटी रुपये इतकी होती, पण आता बिटकॉईनचा भाव अचानक घसरल्याने अमिताभ यांना 640.3 कोटींचा फटका बसला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा