अमिताभ बच्चन यांना कोरोना, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

अमिताभ बच्चन यांना कोरोना, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचं शुटिंग बंद असल्याने अमिताभ हे घरीच होते.

  • Share this:

मुंबई 11 जुलै: बिग बी अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांची COVIDE-19चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे. संबंधित सर्वांना याची माहिती देण्यात आली आहे. घरातल्या सर्वांचीही चाचणी करण्यात येणार आहे. गेली 10 दिवस ती सगळी मंडळी माझ्यासोबत होती अशी माहितीही त्यांनी दिली आहे. अमिताभ हे 77 वर्षांचे आहेत.

या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचं शुटिंग बंद असल्याने अमिताभ हे घरीच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अमिताभ यांच्या जनक आणि जलसा या बंगल्यात राहणाऱ्या सगळ्यांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. प्रशासनानेे नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 11, 2020, 10:46 PM IST

ताज्या बातम्या