Home /News /entertainment /

कुणाला कशाचं तर अमिताभ बच्चन यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत म्हणाले...

कुणाला कशाचं तर अमिताभ बच्चन यांना वाढत्या दाढीचं टेन्शन, फोटो शेअर करत म्हणाले...

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

  मुंबई, 15 जानेवारी - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ आणि ब्लॉग्स शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अनेक वेळा ते फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देतात. आता त्यांनी असाच एक फोटो (Amitabh Bachchan latest photo)  शेअर केला आहे. हा फोटो त्यांचं वाढतं वय तर दर्शवतोच पण याहीपेक्षा त्यांची दाढी तिही पांढरीशुभ्र लक्षवेधून घेते. पण या वयातही चेहऱ्यावरचं तेज कायम आहे. शिवाय या फोटीची कॅप्शन देखील सध्या चर्चेत आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या एक फोटो इन्स्टाला शेअर केला आहे. यामध्ये डोळ्याला चष्मा दिसत आहे तर त्यांची वाढलेली दाढी देखील सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. शिवाय त्यांनी हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, काम तर बंद आहे मात्र ही दाढी वाढत चालली आहे. चाहत्यांकडून त्यांच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. या फोटोवर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत काळजी घ्या असं म्हटलं आहे. यावरून एकच वाटत आहे की, त्यांना वाढत्या दाढीचं टेन्शन आलं आहे. मात्र असं जरी असलं तरी या वयातलाही त्यांचा हा लुक चाहत्यांना आवडला आहे.
  बच्चन कुटुंब जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणामुळे चर्चेत मागच्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंब जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. आहे. याप्रकरणी अमिताभ यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) दिल्लीतील लोकनायक भवन येथे ईडीसमोर हजर राहिली होती. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. या नेत्यांमध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर करचुकवेगिरीचे आरोप आहेत. याबाबत कर अधिकारी तपास करत आहेत. वाचा-Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं केला कमेंट सेक्शन ऑफ! दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच ‘ब्रम्हास्त्र’, ‘झुंड’, ‘चेहरे’, ‘मे डे’, ‘गुड बाय’ आणि ‘द इंटर्न’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. या व्यतिरिक्त छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती 13 ’चे सुत्रसंचालनही करतानाही देखील ते दिसत आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या