Home /News /entertainment /

Kaun Banega Crorepati: पुन्हा मिळणार करोडपती बनण्याची संधी,'या' दिवशी सुरू होणार रजिस्ट्रेशन

Kaun Banega Crorepati: पुन्हा मिळणार करोडपती बनण्याची संधी,'या' दिवशी सुरू होणार रजिस्ट्रेशन

छोट्या पडद्यावर अनेक रिएलिटी शो येत असतात. त्यामध्ये काही शो असे आहेत, जे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतच आहेत शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. या यादीमध्ये सर्वात वर कोणतं नाव असेल तर ते 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati 14) हे होय. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 2 एप्रिल- छोट्या पडद्यावर अनेक रिएलिटी शो येत असतात. त्यामध्ये काही शो असे आहेत, जे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतच आहेत शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. या यादीमध्ये सर्वात वर कोणतं नाव असेल तर ते 'कौन बनेगा करोडपती'  (Kaun Banega Crorepati 14)  हे होय. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' या शोचा नवा सीजन पुन्हा पडद्यावर घेऊन येत आहेत. 'कौन बनेगा करोडपती'च्या 14 व्या सीजनसह, बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने शनिवारी सोशल मीडियावर नवीन सीजनचा पहिला प्रोमो रिलीज केला आहे. त्यामुळे प्रेक्षक फारच आनंदी आहेत. या शोमुळे अनेकांना आपल्या ज्ञानाचा योग्य वापरत करता येतो. KBC 14 चा पहिला प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना आगामी 'कौन बनेगा करोडपती 14' च्या नोंदणीबाबत माहिती देत ​​आहेत. प्रोमोमध्ये ते म्हणत आहेत, 'स्वप्ने फक्त बघायची नसतात, तर आता ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे'.
  काय आहे प्रोमो- प्रोमोबद्दल एक तरुण जोडपे दिसून येत आहे. या नवरा बायकोपेक्षा मोठं घर बांधू, मुलांना चांगलं शिक्षण देऊ आणि कधीतरी दोघे जोडीने स्वित्झर्लंडला जाऊ असं वचन आश्वासन देत आहे. कुटुंबासाठी त्याच्या स्वप्नांबद्दल ऐकून पत्नी आनंदी होते. मात्र बरीच वर्षे उलटून जातात आणि हे पतीपत्नी वृद्ध होतात. पती अजूनही त्याच स्वप्नांबद्दल, त्याच घराच्या छतावर आपल्या पत्नीशी बोलत असतो. मात्र, यावेळी नवऱ्याचं हे बोलणं ऐकून पत्नी रागावते. कारण कित्येक वर्ष झाली ते फक्त स्वप्नातच जगत आहेत'. त्यावेळी अमिताभ बच्चन म्हणतात फोन उचला आणि आपली स्वप्ने पूर्ण करा. असं स्वप्नात जगू नका. कधी सुरु होणार रजिस्ट्रेशन- KBC नोंदणी 9 एप्रिल, रात्री 9 वाजल्यापासून सुरू होत आहे. फक्त सोनी वर. तुम्हीही 9 एप्रिलपासून प्रश्नांची उत्तरे देऊन KBC चा भाग होऊ शकता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC

  पुढील बातम्या