मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /KBC13:'सर, तुम्ही GSTभरला का?' स्पर्धकाच्या या प्रश्नावर पाहा काय होतं अमिताभ बच्चन यांचं उत्तर

KBC13:'सर, तुम्ही GSTभरला का?' स्पर्धकाच्या या प्रश्नावर पाहा काय होतं अमिताभ बच्चन यांचं उत्तर

शोमध्ये सहभागी झालेल्या संध्या माखीजा (Sandhya Makheeja) यांनी बच्चन यांना असा प्रश्न विचारला, की तो ऐकल्यानंतर काही क्षणासाठी बच्चन एकदम शांत बसले.

शोमध्ये सहभागी झालेल्या संध्या माखीजा (Sandhya Makheeja) यांनी बच्चन यांना असा प्रश्न विचारला, की तो ऐकल्यानंतर काही क्षणासाठी बच्चन एकदम शांत बसले.

शोमध्ये सहभागी झालेल्या संध्या माखीजा (Sandhya Makheeja) यांनी बच्चन यांना असा प्रश्न विचारला, की तो ऐकल्यानंतर काही क्षणासाठी बच्चन एकदम शांत बसले.

  मुंबई, 29 सप्टेंबर- बॉलिवूडचे महानायक बिग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या अभिनयाइतकीच निवेदनशैलीही लोकप्रिय आहे. कौन बनेगा करोडपतीचा (Kaun Banega Crorepati) (KBC 13) तेरावा सीझन बच्चन होस्ट करत आहेत. या शोमध्ये बिग बी त्यांच्या खास शैलीत स्पर्धकाशी गप्पा मारतात. कधी कधी त्या गप्पांच्या नादात त्यांची बोलती बंद व्हायची पाळी येते. असाच काहीसा प्रकार एका महिला स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नानंतर झाला.

  या शोमध्ये सहभागी झालेल्या संध्या माखीजा (Sandhya Makheeja) यांनी बच्चन यांना असा प्रश्न विचारला, की तो ऐकल्यानंतर काही क्षणासाठी बच्चन एकदम शांत बसले. त्यानंतर मात्र त्यांनी दिलेलं उत्तर ऐकल्यावर सर्व जण हसले आणि टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  (हे वाचा:Samantha Akkineni खरंच मुंबईला शिफ्ट होणार? अभिनेत्रीने लाइव्ह येत दिलं उत्तर)

  अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. बरेच जण आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे करोडपती होण्याच्या इच्छेने हॉटसीटपर्यंतचा प्रवास करून या शोमध्ये सहभागी होतात. हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला ताण येऊ नये, यासाठी अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत मधेमधे चर्चा करत असतानाच दिलखुलास गप्पाही मारतात. अनेकदा स्पर्धकांसोबत चेष्टामस्करीही करतात. कारण एक तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसल्यामुळे आणि प्रश्न ऐकल्यानंतरही अनेक स्पर्धकांवर मानसिक ताण येत असतो. तो दूर होण्यासाठी बच्चन स्पर्धकांसोबत चेष्टामस्करी करतात. त्यामुळे सेटवर खेळीमेळीचं वातावरण राहतं.

  काही स्पर्धक मात्र कुठलाही ताण न घेता, या शोमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही, तर बच्चन केव्हा आपल्यासोबत चेष्टामस्करी करतील, याची संधीच शोधत असतात. असंच काहीसं नुकत्याच झालेल्या एका एपिसोडदरम्यान घडलं. जीएसटी (GST) निरीक्षक संध्या माखीजा हॉटसीटवर होत्या. त्यांनी अमिताभ यांना असा प्रश्न विचारला, जो ऐकून बिग बी क्षणभर गप्प राहिले; मात्र नंतर उत्तरादाखल अमिताभ बच्चन जे बोलले ते ऐकल्यावर सगळेच हसले.

  (हे वाचा:माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंवर अभिनेता रणवीर शौरीचं आपत्तीजनक ट्विट)

  त्याचं झालं असं, की अमिताभ बच्चन यांनी संध्या माखीजा यांना त्या ज्या 'राज्य कर निरीक्षक' या पदावर आहेत, त्याबद्दल काही माहिती देण्यास सांगितलं. त्यावर संध्या म्हणाल्या, 'सर, मी जीएसटी विभागात राज्य कर निरीक्षक आहे आणि माझं काम लोकांना करासंदर्भातल्या गोष्टी सुटसुटीत करून देणं हे आहे. तसंच, जे कर भरत नाहीत, अशांना वठणीवर आणणं हेदेखील माझं काम आहे. मी प्रामाणिक करदात्यांना मदत करते आणि काळा पैसा ठेवणाऱ्यांवर लक्ष ठेवते.' यावर, अमिताभ यांनी त्यांना विचारलं, की 'तुम्ही वाईट लोकांना चांगलं बनवता? आणि लोकांनी जीएसटी वेळेत भरला नाही तर त्यांना दंड लावता?' यावर संध्या म्हणाल्या, 'अशा व्यक्तीं 10 हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.’

  नंतर संध्या यांनी हसतहसत बच्चन यांना विचारलं, की 'सर, तुम्ही तर जीएसटी भरला आहे ना?'

  हे ऐकल्यावर मात्र अमिताभ बच्चन थोडा वेळ गप्प झाले आणि मग आजूबाजूला पाहत म्हणाले, 'देवीजी, आम्ही भरला नसता तर आम्हाला इथे बसू दिलं नसतं. तुमच्यासारखे लोक आम्हाला पकडून घेऊन गेले असते.'बिग बींचं हे उत्तर ऐकल्यानंतर एकच हशा पिकला नसता, तरच नवल.

  First published:
  top videos

   Tags: Amitabh Bachchan, KBC