...जेव्हा 'या' अभिनेत्रीकडून अमिताभ बच्चन यांना खावा लागला होता मार

...जेव्हा 'या' अभिनेत्रीकडून अमिताभ बच्चन यांना खावा लागला होता मार

'रेश्मा और शेरा' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक रंजक किस्सा नुकताच वहिदा यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये शेअर केला.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : एखादा सिनेमा बनवताना त्याच्या असंख्य आठवणी नकळतपणे मागे राहतात असं म्हटलं जातं. बॉलिवूडचे बिग बी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काहीसं असंच घडलं. अमिताभ यांच्यांशी जोडलेला एक किस्सा बॉलिवूडच्या एका जेष्ठ अभिनेत्रींनी नुकताच शेअर केला.  अभिनेत्री वहीदा रहमान आणि अमिताभ बच्चन एकेकाळची बॉलिवूडची हॉट जोडी मानली जात असे. एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक रंजक किस्सा नुकताच वहीदा यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये शेअर केला. या शोमध्ये वहीदा रहमान यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख आणि हेलन या देखील उपस्थित होत्या. यावेळी वहिदा यांनी अमिताभ यांच्याबद्दल सांगितलेला किस्सा ऐकून सर्वांनाच हसू आवरणं कठीण झालं.

हा किस्सा 'रेश्मा और शेरा' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडला. या सिनेमात अमिताभ यांना वहीदांनी कानाखाली मारायचं असा सीन होता. वहीदा सांगतात माझ्यासाठी खूपच कठीण होता. दिग्दर्शक सुनिल दत्त म्हणाले जर तुम्ही हा सीन नीट पूर्ण केला नाही तर जास्त रिटेक घ्यावे लागतील आणि तेवढाच अमिताभ यांना जास्त मार खावा लागेल. त्यामुळे मन घट्ट करून तुम्ही एकदाच जोरात मारा म्हणजे एका टेकमध्ये काम होऊन जाईल.
 

View this post on Instagram
 

Tonight 9:30 pm on #TheKapilSharmaShow @tkssofficial_ @sonytvofficial @kikusharda @sumonachakravarti @bharti.laughterqueen @krushna30 @archanapuransingh don’t miss it


A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

वहीदा पुढे म्हणल्या, मी अमिताभ यांना सांगितलं की मी आता खूप जोरात मारणार आहे, ते म्हणाले ठीक आहे. पण जेव्हा तो शॉट संपला आणि नशीबानं एकाच टेकमध्ये हा शॉट पूर्ण झाला, नंतर गालावर हात ठेऊन अमिताभजी माझ्याकडे आणि मला म्हणाले वहीदाजी, खरंच हे खूप चांगलं होतं. वहीदांनी हा किस्सा सांगितल्यावर मात्र सर्वांनाच हसू आलं. या शोचा प्रोमो सोनी टीव्ही आणि कपिल शर्मानं सोशल मीडियावर शेअर केला. वहीदा रहमान, आशा पारेख आणि हेलन या एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री एकाच मंचावर पाहायला मिळणार असल्यानं या एपिसोडबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा एपिसोड या विकेंडला सोनी टीव्हीवर प्रसारित केला गेला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 10:24 AM IST

ताज्या बातम्या