News18 Lokmat

अमिताभ बच्चन यांनी केलं रणवीरचं बारसं, सोशल मीडियावर शेअर केलं 'हे' नाव

अमिताभ बच्चन यांनी रणवीरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला नव्या नावाने हाक मारली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 01:44 PM IST

अमिताभ बच्चन यांनी केलं रणवीरचं बारसं, सोशल मीडियावर शेअर केलं 'हे' नाव

मुंबई, 27 जावेवारी : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचं वय त्यांच्या शरीरावरून ओळखणं कठीण आहे. अमिताभ यांच्या काळातील सर्व अभिनेत्यांनी सिनेसृष्टीपासून रामराम केला असला तरीही ते आजही तरुण कलाकारांसोबत काम करताना दिसतात आणि प्रत्येक कलाकाराबद्दल त्यांचं मत व्यक्त करत असतात.


अमिताभ यांनी रणवीर सिंगसोबत इव्हेंट कार्यक्रमासाठी ते परफॉर्म करणार आहेत. या परफॉरमन्सच्या सराव करताना रणवीरसोबतचा एक फोटो अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अमिताभ यांनी रणवीर सिंगचं नव्यानं बारसं केलं असून त्यांनी रणवीरला एका नव्या नावाने हाक मारली आहे.Loading...


 

View this post on Instagram
 

Rehearsals for the Police function .. and bumping into the Electric Eclectic Ranveer ..💕😂😂


A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

अमिताभ बच्चन यांनी या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ते दोघं गळेभेट करताना दिसत आहेत. रणवीरचं सिनेसृष्टीतील प्रत्येक दिग्गज कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. असंच प्रेम अमिताभ यांना मारलेल्या घट्ट मिठीतून दिसत आहे.

मुंबई पोलिसांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन आणि रणवीर सिंग एकत्र परफॉरम करणार असल्याचा अंदाज आहे. या परफॉरमन्सच्या सरावाचा फोटो शेअर करत अमिताभ यांनी लिहिलं आहे की, 'पोलिसांच्या कार्यक्रमाचा सराव करताना माझी भेट इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक रणवीरसोबत झाली आहे' अमिताभ बच्चन यांनी रणवीरच्या कपड्यांचा अवतार पाहून त्याला या नावाने हाक मारली असावी किंवा त्यांच्यातील एनर्जी पाहून या इलेक्ट्रिक नाव ठेवलं असावं.


अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळेंच्या दिग्दर्शनाखाली काम करत आहेत. त्यांचा आगामी 'झुंड' सिनेमाचं शुटिंग नागपुरात काही दिवसांपूर्वीच पूर्ण झालं आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणानंतर अमिताभ बच्चन ब्राम्हास्त्र सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र असतील. ब्रम्हास्त्र सिनेमात ते एका प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 01:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...