कडाक्याच्या उन्हामुळे अमिताभ बच्चन यांची झाली 'अशी' अवस्था, म्हणाले...

कडाक्याच्या उन्हामुळे अमिताभ बच्चन यांची झाली 'अशी' अवस्था, म्हणाले...

कडाक्याच्या उन्हामुळे फक्त मुंबईकरच नाही तर बॉलिवूड कलाकारही त्रस्त झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 02 जून : सध्या संपूर्ण देशभरात सर्वत्र लोक कडाक्याच्या उन्हामुळे वैतागले आहेत. देशातील दिल्ली, जयपूर, लखनऊसोबतच आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उष्णतेनं यंदा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे या उन्हामुळे फक्त मुंबईकरच नाही तर बॉलिवूड कलाकारही त्रस्त झाले आहेत. अशातच बीग बी अमिताभ बच्चन यांनी याबाबत एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन उन्हाळा सुद्धा विनोदी अंदाजात घेताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये एक विनोद शेअर केला असून सकाळापासून आतापर्यंत अमिताभ यांनी जवळपास 12 ट्वीट केले आहेत.

अमिताभ यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक विनोद शेअर केला. त्यांनी लिहिलं, 'या उन्हाळ्यानं लोकांची हालत अशी झाली आहे की, 'तजुरबा' लिहिलं असलं तरी ते लोक 'तरबुज' असं वाचू लागले आहेत.' यासोबत त्यांचा एक जुना कलरफुल फोटो शेअर केला आहे.

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये अमिताभ यांनी लिहिलं, 'हे जग आपल्या गरजांच्या नियमानुसार चालतं, हिवाळ्यात जो सूर्य आपल्याला हवाहवासा वाटतो, तोच सूर्य उन्हाळ्यात मात्र नकोसा होतो. शेवटी तुमची किंमत लोकांना तेव्हाच समजते, जेव्हा त्यांना तुमची गरज असते.'

चाहता असावा तर असा! या सुपरस्टारच्या काही मिनिटांच्या सीनसाठी चाहत्याने खर्च केले १ लाख रुपये

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवसं सर्वांना या उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी लवकर पावसाची शक्यता आहे. याशिवाय दिल्ली, जयपूरसारख्या ठिकाणी तापमान आणखी वाढेल असा अंदाज आहे. यंदा मुंबईसह देशभरात सर्वत्रच उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचं तर सध्या त्यांच्याकडे काही मोठे सिनेमे आहेत. इमरान हाश्मीसोबत 'चेहरे', रणबीर कपूर आणि आलिया भट सोबत 'ब्रह्मास्त्र' या सिनेमांमध्ये ते दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. याशिवाय अमिताभ बच्चन 'से रा नरसिंह रेड्डी' या दाक्षिणात्या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाची कथा स्वतंत्रपूर्व काळातील एका क्रांतिकारकावर आधारित आहे.

जान्हवी कपूरच्या शॉर्ट्सवर कतरिनाची कमेंट, सोनम कपूरने दिलं उत्तर

 

First published: June 2, 2019, 3:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading