10 फेब्रुवारी : बॉलिवूडचे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन. पण बिग बी फक्त फिल्मी दुनियेतच नाही तर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर फॉलोअर्सची भांडण सुरू असतानाच 9 फेब्रुवारीला अमिताभ यांनी काँग्रेस पार्टीच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो केलं आहे. आणि मग काय काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनाला भिडला.
बिग बींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटला फॉलो केल्यामुळे काँग्रेस पार्टीने त्यांना ट्विट करून त्याबद्दल त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांनी त्या ट्विटद्वारे लिहलं की, 'अमिताभजी आम्हाला फॉलो करण्यासाठी धन्यवाद. तुमच्या '102 नॉट आऊट' या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. आम्हाला साजरं करण्यासाठी एक कारण मिळालं. ट्विटरवर आता आमचे 40 लाख फॉलोअर्स झाले आहेत.'
Thank you @SrBachchan ji for the follow. We wish you all the best for ‘102 not out’.
We've another reason to celebrate. We have 4 million followers today. Thank you everybody!#INCLovesYou
बिग बींकडून काँग्रेस पक्षाच्या ट्विटरला फॉलो केल्यापासून काँग्रेस आणि अमिताभ यांच्या जून्या नात्याबद्दल चर्चांना उधान आलं आहे. अमिताभ आणि काँग्रेस पक्षाचे खूप चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं आहे.