Home /News /entertainment /

'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहित आहे का? बिग बींनी सांगितलं नाव

'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहित आहे का? बिग बींनी सांगितलं नाव

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी 'मास्क' या शब्दाचा हिंदी अनुवाद सांगितला आहे.

    मुंबई, 24 जून : कोरोना व्हायरसमुळे अद्यापही सर्वांच्या मनात भीती आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे यातून वाचण्यासाठी सध्या सर्वजण मास्क आणि सॅनेटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? मास्कला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं. जर माहित नसेल तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मास्कचं हिंदी भाषांतर शोधून काढलं आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच त्यांचे फोटो आणि त्याच्याशी संबंधीत किस्से, मोटिव्हेशनल पोस्ट, वडिलांच्या कवितांच्या ओळी पोस्ट करत असतात. नुकतीच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी मास्क या शब्दाचा हिंदी अनुवाद सांगितला आहे. यासोबत त्यांनी स्वतःचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. ज्यात त्यांनी मास्क लावला आहे आणि त्यांचा मास्क सुद्धा खूप स्पेशल आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना बिग बींनी लिहिलं, सापडला! सापडला! सापडला! बऱ्याच मेहनतीनंतर MASK चा हिंदी अनुवाद सापडला. 'नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका' अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते कमेंट करताना दिसत होते. काहींनी याला खूपच भयंकर नाव असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा प्रश्न केबीसीमध्ये विचारला जाऊ शकतो असा अंदाज लावला आहे. अनेकांचं म्हणणं आहे की, हे नाव इतकं किचकट आहे की, लक्षात ठेवणं सुद्धा खूप कठीण आहे.
    अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर काही काळापूर्वीच त्यांचा गुलाबो सिताबो हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा अमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला होता. ज्यात अमिताभ यांच्यासोबत आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय ते लवकरच 'ब्रह्मास्त्र' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या मुख्य भूमिका आहेत.
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood

    पुढील बातम्या