मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली फोटोमध्ये दिसलं भन्नाट पेंटिंग, किंमत ऐकून बसेल धक्का

अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली फोटोमध्ये दिसलं भन्नाट पेंटिंग, किंमत ऐकून बसेल धक्का

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी शेअर केलेल्या या फोटोच्या मागे भिंतीवर एक मोठं पेंटिंग दिसत आहे. हे पेंटिंग (Painting) कोणाचं आहे, त्याची किंमत किती आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते.

    नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : सध्या देशभरात सर्वत्र दिवाळीचं (Diwali) उत्सवी वातावरण आहे. कोरोनाचं (Corona) सावटही ओसरलं असल्यानं सर्वसामान्य लोक आनंदानं दिवाळीचा सण साजरा करत आहेत. बॉलिवूडमध्येही (Bollywood) दिवाळीचा उत्साह दिसत असून अनेक कलाकारांनी आपल्या दिवाळी सणाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांनीही कलाकारांच्या या फोटोला भरभरून प्रतिसाद दिला आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Big B Amitabh Bachchan) यांनीही आपल्या कुटुंबासोबतचे (Family Photo) दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत. एका विशेष कारणासाठी या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

    अमिताभ बच्चन यांच्या एकत्रित कुटुंबाचा दिवाळीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या फोटोत त्यांचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे. त्याचबरोबर या फोटोतील आणखी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी शेअर केलेल्या या फोटोच्या मागे भिंतीवर एक मोठं पेंटिंग दिसत आहे. या पेंटिंगमध्ये एक मोठा बैल (Bull) असून, त्याचे पुढचे पाय थेट त्याच्या शेपटीला जोडलेले आहेत. या पेटिंगची सर्वाधिक चर्चा होत आहे.

    Video: मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी थेट उल्हासनगरमध्ये

    हे पेंटिंग (Painting) कोणाचं आहे, त्याची किंमत किती आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. अमिताभ बच्चन यांच्या ड्रॉईंग रूममधील हे पेटिंग मनजीत बावा (Manjeet Bawa)नावाच्या प्रसिद्ध चित्रकाराने बनवलं असून, या पेंटिंगची किंमत 4 कोटी रुपये आहे.

    मनजीत बावा हे देशातील एक प्रसिद्ध चित्रकार होते. 1941 मध्ये पंजाबमधील धुरी इथं जन्मलेल्या या कलाकाराने प्राणी, निसर्ग, बासरीचे आकृतिबंध, तसंच माणूस आणि प्राणी एकत्र राहण्याच्या कल्पनेवर चित्रं काढली आहेत. भारतीय पौराणिक कथा आणि सुफी तत्त्वज्ञान ही त्यांची मुख्य प्रेरणा होती. माँ काली आणि भगवान शिव यांचीही त्यांनी अनेक चित्रं काढली आहेत. 2008 मध्ये त्यांचं निधन झालं.

    First published:

    Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Amitabh Bachchan