मुंबई, 17 जुलै : कोरोनाची (coronavirus) लागण झाल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना रुग्णालयात दाखल होऊन आता एक आठवडा उलटला. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. त्यांच्यावर चाहत्यांचा प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव होतोच आहे. इतकं प्रेम पाहून अमिताभही भारावून गेलेत. त्यांनाही चाहत्यांचे खूप आभार मानायचे आहेत मात्र रुग्णालयाच्या प्रोटोकॉलमुळे ते शक्य होत नाही आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
अमिताभ बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या आरोग्याबाबतची माहिती देत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही सातत्याने आभार मानत आहेत. अमिताभ यांनी चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला आणि अभिषेकचा फोटोही लावला आहे.
T 3597 - In happy times , in times of illness, you our near and dear, our well wishers, our fans have ever given us unstinting love , affection care and prayer .. we express our bountiful gracious gratitude to you all .. in these circumstances hospital protocol, restrictive !🙏 pic.twitter.com/ksqlHvXfmo
अमिताभ म्हणाले, "माझ्या आनंदी क्षणात आणि आता आजारपरणातही तुम्ही आमच्यासोबत आहात. आमचे हितचिंतक, आमच्या चाहते आम्हाला खूप प्रेम देत आहे, आमची खूप काळजी करत आहे आणि आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत. आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. तुमचे खूप आभार मानायचे आहेत मात्र हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलमुळे ते शक्य होत नाही"
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या यांना कोरोनाची लागण झाली. अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
11 जुलैला रात्री बीग बींना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले.
यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.