मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Amitabh Bachchan: 'आणखी एक साथीदार सोडून...' जवळच्या मित्राच्या निधनानंतर कोसळले अमिताभ

Amitabh Bachchan: 'आणखी एक साथीदार सोडून...' जवळच्या मित्राच्या निधनानंतर कोसळले अमिताभ

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे खास मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने अमिताभ यांना चांगलाच धक्का बसल्याचे दिसत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 13 नोव्हेंबर : मनोरंजनविश्वातून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं नुकतंच निधन झालं. जिममध्ये वर्कआउट करत असताना या अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला. अशातच मनोरंजनविश्वातून आणखी एक वाईट बातमी आज सकाळी समोर आली . बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट लेखक आणि निर्माता राकेश कुमार यांचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये एक पोकळी निर्माण झाली असून कलाकार त्यांच्या जाण्याचे दुःख करत आहेत. अशातच त्यांचे जवळचे मित्र बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांचे खास मित्र आणि चित्रपट दिग्दर्शक राकेश कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. एक भावनिक ब्लॉग लिहून बिग बींनी राकेश कुमार याना श्रद्धांजली वाहिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये राकेश कुमार यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली नसल्याचं सांगितलं आहे आणि त्याचं कारणही उघड केलं आहे. भावूक होऊन अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलयं की, 'आणखी एक दुःखद दिवस. आणखी एक साथीदार आम्हाला सोडून गेला, विशेषतः मी. 'जंजीर'मधला राकेश मेहरा यांचा पहिला सहाय्यक दिग्दर्शक, त्यानंतर पीएमच्या इतर चित्रपटांसाठी स्वतंत्र दिग्दर्शक (प्रकाश मेहरा, ज्यांना आम्ही गंमतीने देशाचे पीएम म्हणतो), एकटा 'हेरा फेरी', 'खून स्वेट', 'मि. 'नटवरलाल', 'याराना' सारखे चित्रपट केले. सेटवर आणि बाहेर इतर सामाजिक कार्यक्रमांना आणि होळीला मोठ्या सौहार्दाने हजेरी लावायची.'

हेही वाचा - KBC14: केबीसीच्या मंचावर आला मजुराचा लेक; म्हणाला 'समाजात इज्जत कमावण्यासाठी...'

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिले की, 'सगळे एकामागून एक गेले पण राकेश कुमार सारखे काही लोक आपली छाप सोडतात, जी मिटवणे किंवा विसरणे कठीण असते. पटकथा आणि दिग्दर्शनाची त्यांची समज, त्यांचे लेखन आणि क्षणार्धात अंमलबजावणी, 'नट्टू' आणि 'याराना' दरम्यानच्या लोकेशनवरची त्यांची खलबते. त्याला आमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता आणि त्याने आम्हाला विचित्र दिवसांमध्ये शूटिंगमधून विश्रांती घेण्याचे स्वातंत्र्य दिले जेणेकरून आम्ही आराम करू शकू. आजूबाजूला फिरू शकतो आणि त्यांच्यासोबत आनंदाने राहू शकतो.

बिग बी राकेशच्या अंत्यसंस्कारात का येणार नाहीत?

अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमध्ये पुढे लिहितात, 'एक अतिशय मनमिळाऊ आणि आनंदी व्यक्ती, जो कोणत्याही प्रकारच्या अडचणीत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतो.' ब्लॉगमध्ये बिग बींनी राकेशच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहण्याचे कारण सांगितले आणि लिहिले की, 'नाही, मी त्यांच्या अंत्यविधीला जाण्यास संकोच करेन, कारण मी राकेशला असे पाहू शकणार नाही. तू तुझ्या कथा आणि चित्रपटाने आमच्यासारख्या अनेकांना खास बनवले आहेस. राकेश तुझी खूप आठवण येईल.

10 नोव्हेंबर रोजी मुंबईत दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन झाले. 81 वर्षीय राकेश कुमार दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. रविवार, 13 नोव्हेंबर रोजी मुंबईत राकेश यांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood News, Entertainment