बिटकॉईनच्या मदतीने अमिताभ बच्चन यांनी कमावले 110 कोटी !

बिटकॉईनच्या मदतीने अमिताभ बच्चन यांनी कमावले 110 कोटी !

बच्चन कुटुंबीयांनी दीड वर्षांआधी मेरिडीयनमध्ये 1.6 कोटी रुपये गुंतवले होते ज्याची आताची किंमत 110 कोटी रुपयांच्या आसपास पोहचली आहे.

  • Share this:

20 डिसेंबर : बिटकॉईनच्या मदतीने पैसे कमवणाऱ्यांमध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चनही मागे नाही आहेत. बच्चन कुटुंबीयांनी दीड वर्षांआधी मेरिडीयनमध्ये 1.6 कोटी रुपये गुंतवले होते ज्याची आताची किंमत 110 कोटी रुपयांच्या आसपास पोहचली आहे.

- अमिताभ यांच्या गुंणतवणुकीबद्दल

2015मध्ये अमिताभ बच्चन यांनी मेरीडियन टेक पीटीईमध्ये 1.6 कोटी रुपये गुंतवले होते. ही सिंगापूरची एक लहान तंत्रज्ञान आणि आर्थिक फर्म आहे. पण मागच्याच आठवड्यात या कंपनीत नाट्यमय बदल झाला. अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये मेरीडियन टेक पीटीई कंपनी लिस्टिटेड झाल्यानंतरच अमेरिकेच्या लॉन्गफिन कॉर्प कंपनीने या कंपनीला तातडीने विकत घेतलं.

2015मध्ये ज्या जिद्दू डॉट कॉमवर अमिताभ यांनी गुतवणूक केली होती. तेव्हा ती एक नुकतीच सुरू झालेली कंपनी होती. डिसेंबर 2017मध्ये ती 'ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी एंपावर्ड सॉल्यूशंस प्रोव्हाडर' म्हणून घोषित करण्यात आली. म्हणजेच आता ही अशी कंपनी झाली जी वेगवेगळ्या देशातल्या कंपनीच्या क्रिप्टोकरंसीज (बिटकॉईन)चा वापर करुन अल्पपत पुरवठा करते.

पैशांच्या दुनियेतील 'ब्लॉकचेन' आणि 'क्रिप्टोकरंसी' या दोन जादूच्या शब्दांनी लॉन्गफिन कंपनीचे शेअर 1000 टक्क्यांनी वाढले आणि जेव्हा त्यांनी जिद्दू डॉट कॉम कंपनीला विकत घेतलं तेव्हा त्या कंपनीचे शेअर थेट 2500 टक्क्यांनी वाढले.

सूत्रांच्या माहितीनुसार, मेरिडियन टेकमध्ये आपल्या होल्डिंगच्या बदल्यात, बच्चन कुटुंबीयाला मालमत्ता खरेदी केल्यानंतर लॉग्नफिनचे 2,50,000 शेअर्स मिळाले. पण सोमवारी लॉन्गफिन कंपनीची स्टॉक किंमत 70 डॉलर इतकी होती मग या किमतीनुसार बच्चन कुटुंबायांची मालमत्ता किंमत 1.75 कोटी डॉलर इतकी झाली. जी चालू विनिमय दरानुसार 114 कोटी रुपये इतकी आहे.

First published: December 20, 2017, 6:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading