Coronavirus: अमिताभ बच्चन एकटेच दाखल आहेत रुग्णालयात आणि केली ही विनंती

Coronavirus: अमिताभ बच्चन एकटेच दाखल आहेत रुग्णालयात आणि केली ही विनंती

अमिताभ बच्चन मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची COVID चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : देशभरात (Coronavirus) कोरोनाचा कहर सुरू असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची लागण (Covid-19) झाल्याची बातमी समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट (TWeet)करुन याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईतील नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) त्यांना दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.बच्चन यांनीच ट्वीटरवरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 'गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांनी कृपया COVID टेस्ट करून घ्यावी', अशी विनंती त्यांनी Tweet करून केली आहे.'

माजी मुख्यमंत्री आणि भाजपने नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईत कोरोनाचा कहर वाढत असताना अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यात बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आल्याने अख्ख्या बॉलिवूडला धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.

अमिताभ यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता COVID चाचणी होणार आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचं शुटिंग बंद असल्याने अमिताभ हे घरीच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

First published: July 11, 2020, 11:17 PM IST

ताज्या बातम्या