'ठोक दो...', एका कमेंटमुळे भडकला चाहत्यांसमोर नतमस्तक झालेला महानायक

'ठोक दो...', एका कमेंटमुळे भडकला चाहत्यांसमोर नतमस्तक झालेला महानायक

कोरोनाशी लढा देणाऱ्या बच्चन कुटुंबासाठी अनेकांना प्रार्थना केली. मात्र एका व्यक्तीने बच्चन यांच्याबाबत अशी प्रतिक्रिया दिली ज्यामुळे बिग बींना रागाला आवर घालता आला नाही.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : बिग बी अमिताभ बच्चन (amitabh bachchan) सध्या रुग्णालयात कोरोनाविरोधात लढा लढत आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनवरही उपचार सुरू आहेत. सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना आपले अश्रू अनावर झाले. बच्चन कुटुंबं लवकरात लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे अमिताभ यांनी हात जोडून आणि नतमस्तक होतं वारंवार आभार मानलेत. मात्र आता एका कमेंटमुळे बिग बी यांना आपला राग अनावर झाला आहे.

"तुमचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा अशी आशा मला आहे", अशी प्रतिक्रिया अमिताभ यांना एका अज्ञाताकडून आली. त्यानंतर अमिताभ यांना आपल्या रागाला आवर घालता आला नाही. आपल्या ब्लॉगवर त्यांनी हा आपला संताप व्यक्त केला.

अमिताभ म्हणाले, "मिस्टर अज्ञात, तुम्ही तुमच्या वडिलांचं नावही नाही लिहिलं आहे. कारण तुम्हाला माहितीच नाही की तुमचा बाप कोण आहे. एकतर मी जिवंत राहेन किंवा मरेन. जर मी मेलो तर एका सेलिब्रिटीच्या नावावर आपला राग व्यक्त करण्याची आणि निंदा करण्याचं काम तुम्ही पुढे करू शकत नाही. तुम्ही जे काही लिहिलं आहे ते दाखवणारा राहणार नाही. कारण ज्या अमिताभ बच्चनला तुम्ही लक्ष्य केलं आहे तो जिवंत राहणार नाही"

हे वाचा - नात आणि सुनेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महानायकाला कोसळलं रडू!

"मात्र देवाच्या आशीर्वादाने मी जगलो तर मग तुम्हाला संतापाचं वादळ पेलावं लागेल. माझ्याकडून नाही तर माझ्या 90 मिलियन फॉलोअर्सकडून जे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत  आहेत. ही फक्त एक्सटेंडेट फॅमिली नाही तर एक्सटर्मिनेश फॅमिली आहे आणि मला फक्त इतकंच म्हणायचं आहे. 'ठोक दो साले को", असं अमिताभ म्हणालेत.

हे वाचा - प्रसिद्ध अभिनेत्याकडे नाही उपचारासाठी पैसे; आमिर, सोनूआधी धावून आला मनोज वाजपेयी

11 जुलैला रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर 12 जुलैला ऐश्वर्या राय आणि आराध्या यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. सुरुवातीलात्या दोघींना होम क्वारंटाइन करण्यात आलं. मात्र नंतर सौम्य लक्षणं दिसू लागल्याने 17 जुलैला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर 27 जुलैला दोघीही कोरोनामुक्त झाल्या. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Published by: Priya Lad
First published: July 28, 2020, 7:01 PM IST

ताज्या बातम्या