नागराज मंजुळेंच्या 'झुंड'साठी अमिताभ बच्चन नागपुरात

नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमाचं शूटिंग नागपुरात सुरू होतंय. त्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात दाखल झालेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2018 07:51 PM IST

नागराज मंजुळेंच्या 'झुंड'साठी अमिताभ बच्चन नागपुरात

मुंबई, 4 डिसेंबर : नागराज मंजुळेंच्या 'झुंड' सिनेमाचं शूटिंग नागपुरात सुरू होतंय. त्या शूटिंगसाठी अमिताभ बच्चन नागपुरात दाखल झालेत. लोकांनी गर्दी करू नये म्हणून ते गुपचूप आले. पण त्यांच्या फॅन्सनी त्यांना घेरलंच.


अगोदर झुंडमधून बिग बींनी माघार घेतली होती. पण पुन्हा ते सिनेमाशी जोडले गेलेत. या सिनेमासाठी बिग बी सलग 45 दिवस शूटिंग करणार आहेत तर संपूर्ण सिनेमाचं शूटिंग शेड्युल 85 दिवसांचं असेल. पण असंही कळलंय, की कदाचित ते रोज मुंबई-नागपूर असा फ्लाइटनं प्रवास करतील. पण यात बदलही होऊ शकतो.


बिग बी वगळता सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट नवखी आहे. नागराज यांनी सिनेमात काम करणाऱ्या मुलांना आधीच प्रशिक्षण दिलंय. नागपूरमध्ये शूटिंग सुरू होण्यापूर्वी ही मुलं काही काळ बिग बिनसोबत घालवतील. या सिनेमाची कथा उनाड मुलांना एकत्र करून त्यांची फुटबॉल टीम तयार करणाऱ्या प्रशिक्षकांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन फुटबाॅल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

Loading...


नागराज ह्यांनी बिग बी ह्यांनाच डोक्यात ठेवून ह्या सिनेमाची कथा लिहिली होती. अमिताभ ह्यांच्या होकारामुळे नागराज ह्यांच त्यांच्यासोबत सिनेमा करण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची अशा पुन्हा जागृत झालीये. झुंड हा नागराज मंजुळेंचा पहिला हिंदी सिनेमा आहे.


नागराज यांनी बिकट परिस्थितीत  जेऊरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर नागराज यांचे पदवीपर्यंतचं शिक्षण जेऊर इथे झालं. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते. सुरूवातीपासूनच नागराजला चित्रपटांची आवड होती. पुण्यात शिकत असताना त्याच्या मनात चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...