छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री मागितली माफी

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ बच्चन यांनी मध्यरात्री मागितली माफी

सोनी टीव्हीनं माफीचा स्क्रोल चालवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही मध्यरात्री ट्विटरवरुन माफी मागितली.

  • Share this:

मुंबई, 09 नोव्हेंबर : अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीमध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी ओळखले जातात. पण त्यांच्या कार्यक्रमात एका प्रश्नाच्या पर्यायातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचा आरोप झाल्याने नवा वाद ओढवला. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत होती. यामुळे अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागला. दरम्यान KBC मेकर्स आणि सोनी टीव्हीनं या प्रकरणी माफी मागितली आहे. त्यानंतर अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही ट्विटरवरून माफी मागितली आहे.

केबीसीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही टिका करण्यात आली होती. दरम्यान सोनी टीव्हीनं माफीचा स्क्रोल चालवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही मध्यरात्री 1 वाजून 58 मिनिटांनी ट्विटरवरुन माफी मागितली. सिद्धार्थ बासू नावाच्या युजरच्या ट्वीटवर रिप्लाय देत त्यांनी लिहिलं, ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीच करणार नाही. मात्र आमच्याकडून झालेल्या या चुकीसाठी मी माफी मागतो.’

अनुष्का शर्मासारखी हेल्दी-ग्लोइंग त्वचा हवीय, मग वाचा तिचं ब्युटी सिक्रेट!

नुकत्याच प्रसारित झालेल्या KBC च्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मुघल सम्राट औरंगजेबसंबंधी प्रश्न विचारला. त्याच्या उत्तराला चार पर्याय देण्यात आले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच शिवभक्तांमध्ये नाराजीचा सूर होता आणि बिग बींनी यासाठी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती.

सोशल मीडियावरील विरोध पाहता केबीसी मेकर्सनी त्यांच्या आगामी एपिसोडमध्ये याबद्दल माफीचा स्क्रोल चालवला आहे. सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरून याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'बुधवारी केबीसीच्या एपिसोडमध्ये अनावधानाने छत्रपति शिवाजी महाराज यांचा एक त्रुटीपूर्ण पर्याय देण्यात आला होता. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. लोकांच्या भावनांचा विचार करुन आम्ही खेद व्यक्त करत आमच्या आगामी एपिसोडमध्ये माफीचा स्क्रोल चालवला आहे.'

सनी लियोनीने केला 'लैला मैं लैला' गाण्यावर डान्स, Video Viral

कौन बनेका करोडपती हा शो ताज्या सीझनमध्ये लोकप्रियता टिकवून आहे. त्याच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये गुजरातच्या स्पर्धक शाहेदा चंद्रन अमिताभ यांच्यासमोर होत्या.'कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?' असा प्रश्न शाहेदा यांना विचारण्यात आला. यासाठी चार पर्याय देण्यात आले.

१. महाराणा प्रताप

२. राणा सांगा

३. महाराजा रणजीत सिंह

४. शिवाजी

छत्रपतींचा उल्लेख फक्त शिवाजी असा करण्यात आल्याने महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावर त्याचे पडसाद दिसत आहेत. औरंगजेबाचा उल्लेख सम्राट असा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मात्र एकेरी उल्लेख प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे.

Pagalpanti: 'बीमार दिल' गाण्यात उर्वशी रौतेलाचा 'हॉट' अवतार, पाहा PHOTOS

======================================================================

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 09:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading