पहिल्यांदाच समोर आला बिग बी आणि किंग खानमधील वाद, अमिताभ यांनी केली बोनसची मागणी

पहिल्यांदाच समोर आला बिग बी आणि किंग खानमधील वाद, अमिताभ यांनी केली बोनसची मागणी

काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी शाहरुखला ट्रोल करत 'बदला' सिनेमाच्या यशाबद्दस कोणी काहीच बोलत नसल्याची खंत ट्विटरवर व्यक्त केली होती.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : बिग बी अमिताभ बच्चन आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान यांच्यात सध्या 'ट्विटर वॉर' सुरू आहे. यावरून बिग बी शाहरुखवर नाराज असल्याचं दिसत आहे. असं म्हटलं जातं की, बदला सिनेमाच्या यशाबाबत इंडस्ट्रीमध्ये कोणीही काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं अमिताभ बच्चन नाराज आहेत आणि त्यांनी आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ यांनी शाहरुखला ट्रोल करत 'बदला' सिनेमाच्या यशाबद्दस कोणी काहीच बोलत नसल्याची खंत ट्विटरवर व्यक्त केली होती. त्यावर शाहरुखनंही मजेशीर अंदाजात त्यांच्या ट्वीटवर कमेंट केली होती. मात्र हे इथवरच थांबलं नाही. अमिताभ यांनी नुकतंच एक नवं ट्वीट करत हा विषय इथंच थांबणार नसल्याचं स्पष्ट केलं.

तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'बदला' सिनेमा शाहरुख खानच्या बॅनरखाली बनला होता. सिनेमाच्या कथेपासून ते अभिनयापर्यंत सर्वच बाबतीत सिनेमाचं कौतुक झालं. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमानं चांगली कमाई केली. पण प्रोड्यसर, डिस्ट्रीब्युटर किंवा इंटस्ट्रीमधील कोणाही या सिनेमाच्या यशाबद्दल एक चकार शब्दही न काढल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिलं, 'आता वेळ आली आहे की, या सिनेमाच्या यशाबद्दल कोणीतरी बोलावं. कारण, प्रोड्युसर , लाईन प्रोड्युसर, डिस्ट्रीब्युटर किंवा इंडस्ट्रीमधील कोणीही 'बदला'च्या कौतुकासाठी  एक सेकंदसुद्धा मेहनत घेतली नाही. थँक यू.'अमिताभ यांच्या ट्वीटवरून ते या गोष्टीबाबत खूप नाराज असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर ही गोष्ट थोडं मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया दिली, सर तुम्ही पार्टी कधी देत आहात याचीच तर आम्ही वाट पाहत आहोत.  आम्ही तर रोज रात्री 'जलसा'च्या बाहेर वाट पाहत असतो.मात्र अमिताभ हा मुद्दा एवढ्या सहज हार मानण्यास तयार नाहीत. त्यांनीही शाहरुखच्या ट्वीटला लगेच रिप्लाय दिला. ते म्हणाले, 'ओए... सिनेमात काम मी केलं, प्रोड्यूस तुम्ही केलं, प्रमोशनमध्ये निस्वार्थ योगदान आम्ही दिलं आणि आता पार्टीही आम्हीच द्यायची का ? मी रोज 'जलसा'च्या बाहेर जातो मात्र तिथं कोणीच नसतं.'यावर शाहरुख पुन्हा लिहितो, सर सिनेमा तुमचा आहे, अभिनय तुमचा आहे, हिट पण तुमच्यामुळे झाला... जर तुम्ही नसता तर हा सिनेमा नसता. मग पार्टी भी ? पण यावर गप्प राहतील तर बिग बी कसले. त्यांनी पुन्हा शाहरुखला उत्तर दिलं, 'मान्यवर राजा धिराज (KING KHAN) असं ऐकलं आहे की, 'बदला' तुमच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा होता. तर जेव्हा कंपनीला जेव्हा कोणतंही यश मिळतं किंवा कोणी चांगलं काम करत तेव्हा त्याला बक्षीस दिलं जातं. मग मला माझा बोनस द्या.'अमिताभ यांच्या ट्वीटवर त्यांच्या एका चाहत्यानं  अमिताभ यांच्यावतीनं शाहरुखला टॅग करत म्हटलं, 'किंग खान @iamsrk ji तुम्ही स्वतः मान्य केलं की अमिताभजी नसते तर हा सिनेमा हिट झाला नसता. मग सत्य का लपवत आहात. आमचे आदरणीय  @SrBachchan सर यांना त्यांच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीचा बोनस मिळायलाच हवा.'अमिताभ यांनी आपल्या चाहत्याचं हे ट्वीट रिट्विट करत पुन्हा लिहिलं, 'एक छोटासा बदल, राजा धिराज किंग खान यांच्या करिअरमधील नाही तर त्याची कंपनी रेड चिलीजच्या यशस्वी सिनेमांमध्ये सर्वात अव्वल आहे, यापुढेही अनेक सिनेमा हिट होतील. पण एवढ्या बजेट आणि अशा रिटर्न्सचं बोलायचं झाल्यास हा एक मोठा सिनेमा आहे.'ट्विटरवर ज्या प्रकारे अमिताभ 'बदला' मेकर्सची थट्टा करत आहेत ते पाहून असं वाटत नाही कि, हा वाद एवढ्या लवकर संपेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 14, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या