विरुष्काच्या रिसेप्शनला रेखा मागोमाग आले अमिताभ!

विरुष्काच्या रिसेप्शनला रेखा मागोमाग आले अमिताभ!

विराट आणि अनुष्काच्या लग्नालातही रेखा पुढे आणि अमिताभ मागे अशी दोघांची शानदार एन्ट्री झाली आणि मीडियाने त्यांची ही एन्ट्री कॅमेऱ्यात कैद केली.

  • Share this:

27 डिसेंबर : एका जमान्यात रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी चर्चांना उधाण असायचं. आतापण कोणत्याही कार्यक्रमात ते दोघे आले की त्यांच्या प्रेमाच्या चर्चा ह्या रंगतातच. विराट आणि अनुष्काच्या लग्नालातही रेखा पुढे आणि अमिताभ मागे अशी दोघांची शानदार एन्ट्री झाली आणि मीडियाच्या कॅमेऱ्यात ही एन्ट्री कैद झाली.

नेहमीप्रमाणे या कार्यक्रमालाही रेखाने तिच्या हटके अंदाजमध्ये एन्ट्री केली आणि ती खूप सुंदरही दिसत होती. सुंदर साडी घालून रेखाची एन्ट्री झाल्याच्या अवघ्या 5 मिनिटातच अमिताभ त्यांच्या कुटुंबासोबत आले. हो आता नेहमी असं एकत्र, प्रत्येक कार्यक्रमात पोहचणं या निव्वळ योगायोग आहे की काही आणखी हे आता त्या दोघांनाच माहीत. पण त्यांच्या असं एकत्र येण्याने मीडियामध्ये मात्र चर्चा होते हे नक्की.

विराट आणि अनुष्काच्या या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडच्या सगळ्याच कलाकारांनी हजेरी लावली. क्रिकेट क्षेत्रातल्या मंडळींचीही दमदार एन्ट्री झाली. पण त्यातले खास आणि चर्चेचा विषय ठरली ती रेखा आणि अमिताभ यांची 'एव्हरग्रीन' एन्ट्री.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 01:15 PM IST

ताज्या बातम्या