बारामती, 12 फेब्रुवारी : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं नाव मेडे असं आहे. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यासाठी ते बारामती येथे गेले होते. अन् लक्षवेधी बाब म्हणजे बारामतीच्या विमानतळावर (Baramati Airport) चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी त्यांचे स्वागत केलं.
बिग बींसोबत अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) देखील होता. या दोघांचंही मोठ्या उत्साहात बारामतीकरांनी स्वागत केलं.
अवश्य पाहा - 46 वर्षानंतर बिग बी अवतरले ‘दिवार’च्या सेटवर; लोकेशन पाहून म्हणाले...
बारामती विमानतळावर बिग बींच्या आगामी चित्रपटातील एका प्रसंगाचं चित्रीकरण होणार होतं. खरं तर ही बातमी काही मोजक्याच लोकांना कळवण्यात आली होती. सकाळी अकराच्या सुमारास बिग बी आणि अजय यांचं बारामती विमानतळावर आगमन झालं त्यावेळी सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे बंधू रणजित पवार यांनी या बॉलिवूड कलाकारांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
अवश्य पाहा - ‘मागणं नाहीच, आहे तेच वाचवण्याचा प्रयत्न’; KRK ने उडवली मोदी सरकारची खिल्ली
‘मेडे’ हा अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन तो स्वत:च करणार आहे. शिवाय या चित्रपटात तो मुख्य व्यक्तिरेखा साकारताना देखील दिसेल. हा एक अॅक्शन थ्रिलरपट आहे. या चित्रपटात अजयसोबत अमिताभ बच्चन, रकूल प्रित सिंह देखील झळकणार आहेत. अलिकडेच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Entertainment