Home /News /entertainment /

BIG B म्हणाले, "झाडूच नाही तर लादीही पुसली"; लॉकडाऊनमध्ये महानायकाचीही झाली अशी अवस्था

BIG B म्हणाले, "झाडूच नाही तर लादीही पुसली"; लॉकडाऊनमध्ये महानायकाचीही झाली अशी अवस्था

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन देखील सुटलेले नाहीत. या काळात घरी आपण देखील झाडलोट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : कोरोनाच्या काळात सगळेच घरात बंद होते. घरकामगार पण त्यांच्या घरीच होते. त्यामुळे घरातील कामंदेखील कुटुंबातील व्यक्तींना करावी लागली होती. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच या कोरोनाकाळात बॉलिवूडमधील अभिनेत्यांनी देखील घरातील कामे केल्याचे कबूल केले. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन देखील सुटलेले नाहीत. या काळात घरी आपण देखील झाडलोट केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी हा खुलासा केला आहे. घर झाडण्यासोबतच फरशी पुसण्याची त्यांनी कामं केलं. तसंच घरातील सर्व कामं केल्याचं देखील बच्चन यांनी या वेळी सांगितलं. या कार्यक्रमात हॉट सीटवर असणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी देखील अनेक प्रश्न बच्चन विचारतात. त्याचबरोबर अनेक गोष्टींचा खुलासादेखील करत असतात. या सिझनमध्ये देखील स्पर्धकांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. या वेळी लॉकडाऊनमध्ये घरात बंद असताना आपण कोणकोणती कामे केली याविषयी देखिल भाष्य केले. 15 ऑकटोबरच्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर कोलकात्याच्या रुना साहा बसल्या होत्या. फास्टेस्ट फिंगर फर्स्ट न खेळता हॉट सीटवर बसलेली ती पहिली स्पर्धक ठरली आहे. या वेळी तिने कोरोनाकाळात घरकामामुळे ती कशा पद्धतीनं व्यस्त होती हे सांगितले. त्या एपिसोडमधील एक्सपर्ट रिचा अनिरुद्ध यांनी बच्चन यांना विचारलं, सर आपणही कोरोनाकाळात घरातील कामं केली का? हे वाचा-'या' पात्रांमुळे Mirzapur 2मध्ये येणार नवा ट्विस्ट; वाचा फक्त एका क्लिकवर यावेळी रिचा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बच्चन यांनी आपण घरात झाडलोट आणि फरशी पुसण्याचं काम केलं असं सांगितलं. यावर रिचा यांनी आपला विश्वास बसत नसल्याचं म्हटल्यावर बच्चन यांनी खरंच आपणही काम केल्याचं जोर देऊन सांगितलं. त्याचबरोबर आपल्याला स्वयंपाक येत नसल्याने ते काम केल नाही हे स्पष्ट केलं. पण बाकीची सगळी कामं केल्याचे देखील त्यांनी सांगितले. मी अनेक वर्षांपासून घरातील कामं करतो. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातही ती केली. या काळात काम करताना घरातील कामगारांची किंमत मला लक्षात आल्याचं बच्चन यांनी सांगितलं.
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Bollywood

    पुढील बातम्या