'या' मराठी अभिनेत्यासोबत तब्बल 25 वर्षानंतर बिग बी दिसणार मराठी सिनेमात!

'या' मराठी अभिनेत्यासोबत तब्बल 25 वर्षानंतर बिग बी दिसणार मराठी सिनेमात!

या सिनेमाआधी अमिताभ आणि जया बच्चन यांनी 'आक्का' या मराठी सिनेमामध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली होती.

  • Share this:

मुंबई, 9 मे : बीग बी अमिताभ बच्चन बॉलिवूड नंतर आता मराठी सिनेमातही आपल्या अभिनयाची कमाल दाखवायला तयार झाले आहे. तब्बल 25 वर्षांनतर अमिताभ बच्चन मराठी सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दिग्दर्शक मिलिंद लेले यांच्या 'ए बी आणि सी डी' या सिनेमात अभिनेते विक्रम गोखले प्रमुख भूमिकेत दिसणार असून अमिताभ बच्चन या सिनेमात विक्रम गोखलेंच्या मित्राची भूमिका या सिनेमात साकारत आहेत. या अगोदर २५ वर्षापूर्वीही अमिताभ बच्चन 'आक्का' या मराठी सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून दिसले होते.

'ए बी आणि सी डी'या सिनेमाचं शूटिंग 20 मे पासून मुंबईमध्ये सुरू होत आहे. याशिवाय या सिनेमातील काही दृश्याचं शूटिंग हे पुण्यातही होणार आहे. अमिताभ बच्चन तब्बल 25 वर्षांनंतर मराठी सिनेमामध्ये दिसणार असल्यानं या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाआधी अमिताभ आणि जया बच्चन यांनी 'आक्का' या मराठी सिनेमामध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका साकारली होती. या सिनेमाची निर्मिती अमिताभ यांचे पर्सनल मेकअप मॅन दीपक सावंत यांनी केली होती. श्रीधर जोशींचं दिग्दर्शन असलेल्या 'आक्का'मध्ये जया आणि अमिताभ बच्चन 'तू जगती अधिपती' या आरती गीतामध्ये दिसले होते. याशिवाय अमिताभ यांच्या 'एबीसीएल' या कंपनीनं 2009मध्ये आलेल्या विहिर या मराठी सिनेमाची निर्मितीही केली होती.

या सिनेमाचं कथानक सीडी या व्यक्तिरेखेभोवती फिरते सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखा चंद्रकांत देशपांडे (विक्रम गोखले) म्हणजेच सीडी हे एक निवृत कलाशिक्षक असतात आणि अचानक अभिनेता अमिताभ बच्चन म्हणजेच एबी हे आपले वर्गमित्र असल्याचं त्यांना समजत आणि नंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल होतात. हे या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'ए बी आणि सी डी'मध्ये दोन गाणीही आहेत. या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद हेमंत ऐदलाबादकर यांनी लिहिले आहेत.

मागच्या 7 वर्षात कॅनडाला न गेल्याचं अक्षय कुमारचं विधान खोटं? काय सांगतात सोशल मीडियावरील 'हे' फोटो

अभिनेता इरफान खान झाला भावुक, माध्यमांना लिहिलं 'हे' पत्र

पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन दिसली राखी सावंत, चाहते म्हणाले गद्दार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 08:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading