मुंबई, 23 नोव्हेंबर: बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachachan) वयाच्या 78 व्या वर्षी देखील एखाद्या तरुणालाही लाजवेल एवढं काम करत असतात. अमितजी लवकरच नव्या सिनेमामध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे या फिल्मचं दिग्दर्शन अजय देवगण करणार आहे. या फिल्मचं नाव मेडे असं आहे. अमिताभ बच्चन जसे कामात सक्रीय आहेत तसेच ते सोशल मीडियावरही तेवढेच अॅक्टिव्ह आहेत. बिग बींनी सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे.
बिग बींनी पोस्टमध्ये काय लिहीलं?
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते गाडीमध्ये बसलेले दिसत आहेत आणि त्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला आहे. बिग बींनी या पोस्टमध्ये लिहीलं आहे की, ‘कामातून सुट्टी घेत एक दिवस काढला आहे. तुम्ही एकटे नाही आहात आपण सगळे एकत्र मिळून ही लढाई लढूया. लव्ह यू ऑल’ कोरोना काळात अनेकांनी धीर सोडला आहे. अनेक जण हताश झाले आहेत. अशा लोकांनी बिग बी अमिताभ बच्चन यांनी हा प्रेरणादायी संदेश दिला आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन अजय देवगण एकत्र
अजय देवगण (Ajay Devgan) आणि अमिताभ बच्चन एका नव्या सिनेमामध्ये एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमामध्ये अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण या सिनेमामध्ये पायलटची भूमिकाही करणार आहे. डिसेंबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'मेडे' असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. अजय देवगण या सिनेमामुळे प्रचंड खूश आहे. कारण तो पहिल्यांदाच खुद्द अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.
'मेडे'शिवाय अमिताभ बच्चन यांच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्यांचे काही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. झुंड, चेहरे, ब्रह्मास्त्र या चित्रपटांमधूनही अमिताभ बच्चन आपल्या भेटीला येतील.