Home /News /entertainment /

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यानं त्यांच्यावर केला Kisses चा पाऊस, बिग बी म्हणाले...

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यानं त्यांच्यावर केला Kisses चा पाऊस, बिग बी म्हणाले...

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या एका चाहत्यानं बनवला आहे. या फोटोची सध्या तुफान चर्चा होत आहे.

  मुंबई, 23 जून : बाॅलिवूडचे शेहनशाह म्हणजेच अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bacchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमिताभ यांचे सोशल मीडियावर अनेक फाॅलोवर्स आहेत. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी अनेक निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे चाहते आणि बिग बींमध्ये नेहमीच चिटचॅट ही होत असते. अशातच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या एका चाहत्यानं बनवला आहे(Amitabh fan create a fun photo). त्यामुळे या फोटोची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो जोरदार व्हायरल होत असून याविषयी मजेदार प्रतिक्रियाही येत आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅंन्ड व्हाईट असलेला पहायला मिळत आहे. फोटोमध्ये अमिताभ यांच्या तोंडावर सगळीकडे कीसेसचे इमोजी लावण्यात आले आहेत. या फोटोवर एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. 'त्यांचे डोळे आणि त्यांच्या हसण्याची पद्धत'. अशा प्रकारचा हा फोटो अमिताभ यांच्या एका चाहत्यानं तयार केला आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनीही सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.  हे ही वाचा - 'एक पाऊल नव्या साहसाच्या दिशेने...'; मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केली 'ती' खास पोस्ट चाहत्यानं तयार केलेला भन्नाट फोटो अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी मजेदार कॅप्शनंही लिहिलं आहे. ‘अरे, पर देवी जी… कोई जगह तो छोड़ो हंसने के लिए !’, असं कॅप्शन अमिताभ यांनी लिहिलं. त्यांच्या कॅप्शननं कमेंटबाॅक्समध्ये हास्यकल्लोळ पसरलेला पहायला मिळाला. चाहत्यानं बनवलेल्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकजण फोटोला शेअर करत लाईक्सचा वर्षावही करत आहे.
  दरम्यान, अमिताभ बच्चन 7 दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. बाॅलिवूडमध्ये अद्यापही त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे. अनेक मोठमोठे कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात. अमिताभ यांचा आगामी चित्रपट 'ब्रम्हास्त्र'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला. त्यांच्या नव्या भूमिकेची आणि हटके अभिनयाची चाहते वाट पाहत आहेत.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Bollywood News, Entertainment, Instagram post

  पुढील बातम्या