बिग बी @75!

पण यावर्षी ते आपला वाढदिवस साजरा करत नाही आहेत. कारण तर त्यांनी दिलं नाहीय पण मार्च महिन्यात ऐश्वर्या रायच्या वडिलांचं निधन झालं होतं. ते कारण असावं असा अंदाज लावला जातोय. आणि बच्चन परिवार कालच मालदिवला रवाना झालंय अशीही चर्चा आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2017 12:34 PM IST

बिग बी @75!

 11 ऑक्टोबर: जवळपास ५ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. सुपरस्टार,मेगास्टार, बिग बी, शहेनशहा. अशी अनेक बिरूदं अमिताभ यांना जनतेनं दिली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे.

जगभरात ज्या अभिनेत्यावर लोक भरभरून प्रेम करतात तो तारा आज ७५ वर्षांचा झालाय. पण यावर्षी ते आपला वाढदिवस साजरा करत नाही आहेत. कारण तर त्यांनी दिलं नाहीय पण मार्च महिन्यात ऐश्वर्या रायच्या वडिलांचं निधन झालं होतं. ते कारण असावं असा अंदाज लावला जातोय. आणि बच्चन परिवार कालच मलदिवला रवाना झालंय अशीही चर्चा आहे. आपल्या अभिनयाने तसंच मन जिंकणाऱ्या वागणुकीने अमिताभ बच्चन यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यांच्या डॉन,शराबी, शोले या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या.

अमिताभ बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांचे सुपुत्र आहेत.त्यांचा जन्म 1942 साली उत्तर प्रदेशातील अलाहबाद इथे झाला होता. 1969साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यांनी काही चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केलं आहे. काही काळ त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. कॉँग्रेसच्या तिकीटावर ते खासदारकीची निवडणुक जिंकले ही.पण आयुष्यभर आपल्या अभिनयाने लोकांचं मन रमवणाऱ्या या महानायकाचं मन राजकारणात रमलं नाही आणि ते परत सिनेसृष्टीत परतले.छोट्या पडद्यावरही त्यांनी केबीसी या रिअॅलिटी शोमधून पदार्पण केले. या शोचे यश इतके आहे की गेलं जवळपास एका दशकाहून अधिक काळ हा शो चालू आहे

अशा या शतकाच्या महानायकाला आयबीएन लोकमतच्या मनापासून शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 09:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...