मुंबई, 7 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’(Kaun Banega Crorepati) हा शो खूपच लोकप्रिय आहे. हा एक क्वीज बेस्ड शो आहे. या शोचं मुख्य आकर्षण आहे बिग बी अमिताभ बच्चन(Amitabh Bcchan). त्यांच्या भारदस्त निवेदनाने सर्वच मंत्रमुग्ध होत असतात. हा शो नेहमीच चर्चेत असतो. नुकताच या शोमध्ये ग्वाल्हेरच्या कल्पना सिंह या हॉट सीटवर बसल्या होत्या. त्या ग्वाल्हेरच्या एका शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहेत. त्यांच्यासोबत अमिताभ यांनी ऑनलाइन क्लास आणि त्यांच्या विविध पैलूंवर संवाद साधला. यावेळी अमिताभ यांनी नात आराध्या बच्चनचा(Aaradhya Bcchan) खोडकरपणासुद्धा सगळ्यांना सांगितला.
View this post on Instagram
KBC मध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर कल्पना सिंग या बसल्या होत्या. त्या ग्वाल्हेरच्या एक शाळेमध्ये मुख्याध्यापिका आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत शाळा, मुले आणि ऑनलाईन क्लास या सर्व चर्चा रंगल्या होत्या. कोरोना काळात सर्व कार्यालयांप्रमाणे शाळादेखील ऑनलाईनचं सुरु आहेत. त्यामुळे मुलांना घरी बसून ऑनलाईन लेक्चर करावे लागतात. अमिताभ यांनी सांगितलं की माझी नात अर्थातच ऐश्वर्या आणि अभिषेकची मुलगीसुद्धा सध्या ऑनलाईन क्लास करत आहे.
(हे वाचा: KBC 13:कोणत्या नेत्यानं शिक्षिका म्हणून सुरू केली कारकीर्द? 6 लाखासाठीचा प्रश्न)
यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेकसुद्धा तिला मदत करतात. मीसुद्धा अनेकवेळा तिच्यासोबत बसतो. यावेळी ती कॉम्प्यूटर समोर बसून अनेक विचित्र प्रकार करत असते. ती योगाच्या क्लासमध्ये कॉम्प्यूटरसमोर बसूनचं योगा करू लागते. असे अनेक मजेशीर प्रकार ती करते.
तसेच आराध्या आजी जयासोबत ‘कौन बनेगा करोडपती’ खूपच आवडीने बघते. जया बच्चन या हातातील कोणतही काम सोडून KBC पाहायला बसतात. यावेळी आराध्यासुद्धा आवडीने हा शो पाहाते असं अमिताभ यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan