मुंबई, 8 सप्टेंबर- सर्वांना बाप्पाच्या (Ganesh Festival 2021) आगमनाची आतुरता लागली आहे. बाप्पाच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2021चं गणेशोत्सव सुरु होण्याआधी लालबागचा राजा(Lalbaugcha Raja) विराजमान झाला आहे. इतकचं नव्हे तर लालबागच्या राजाने आज बुधवारी भक्तांना आपलं पहिलं दर्शनदेखील दिलं आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन(Amitabh Bcchan) यांनी लालबागच्या राजाच्या पहिल्या दर्शनाचा व्हिडीओ शेयर(Share Video) केला आहे. तो आत्ता जोरदार व्हायरल होतं आहे. अमिताभ यांनी हा व्हिडीओ शेयर करून केवळ 2 चं तास झाले आहेत. मात्र इतक्यात हा व्हिडीओ 13 लाख 19 हजार लोकांनी पाहिला आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि तितक्याच धुमधडाक्यात साजरा केला जातो. घरामध्ये तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. आणि मोठ्या भक्तीभावने भक्त गणरायाची 10 दिवस सेवा करतात. हा सण म्हणजे एक आनंदी पर्वचं असतो. बाप्पाला ‘विघ्नहर्ता’ म्हटलं जातं. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाने सर्व दुख दूर होतात अशी मान्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचं महत्व अनन्यसाधारण आहे. मात्र गेल्यावर्षीपासून सुरु असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे इतर सणांप्रमाणे यावरदेखील काही मर्यादा आल्या आहेत.
(हे वाचा:VIDEO: गौरी-जयदीपला बाप्पाच्या आगमनाची ओढ; होणार जंगी स्वागत )
त्यामुळेच यावर्षी भक्तांना बाप्पाचं ऑनलाइन दर्शन करता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी हा मार्ग अवलंबण्यात आला आहे. गेली 86 वर्षे लालबागचा राजा अगदी थाटात विराजमान होतो. दूरदूरहून भक्त दर्शनासाठी येतात. 5 लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तब्बल 5 किलोमीटर लांब रांगा लागतात. मात्र कोरोनाने यावर बंधने आणली आहेत.
1934 मध्ये चिंचपोकळीच्या कोळी बांधवांनी प्रथम लालबागच्या राजाची स्थापन केली होती. लालबागच्या राजाला ‘नवसाचा गणपती’देखील म्हटलं जात. बाप्पाकडे मागितलेल्या सर्व इच्छा येथे पूर्ण होतात अशी मान्यता आहे. सर्वसामन्य लोकांपासून देशातील मोठमोठे कलाकार, मंत्री, उद्योगपती, खेळाडू सर्वच लोक मोठ्या भक्तीने येथे दर्शनाला येतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.