बिग बींच्या बिग बजेट सिनेमाची घोषणा; अजय देवगण दिग्दर्शकाच्या खुर्चीत

बिग बींच्या बिग बजेट सिनेमाची घोषणा; अजय देवगण दिग्दर्शकाच्या खुर्चीत

बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमामध्ये अजय देवगण (Ajay Devgan) वर अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : कोरोना (Corona)मुळे बऱ्याच दिवसात कोणताही बिग बजेट सिनेमा थिएटरमध्ये रीलिज झाला नाही. पण लॉकडाऊनमुळे थंड झालेला सिनेमासृष्टीचा कारभार पुन्हा एकदा वेगाने सुरू झाला आहे. येत्या काळात अनेक मोठमोठे कलाकार आपल्याला पडद्यावर दिसणार आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan)ही आपल्या नव्या सिनेमाच्या शूटिंगसाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमामध्ये ते अजय देवगणसोबत झळकणार आहेत.

अमिताभ बच्चन अजय देवगण एकत्र

अजय देवगण (Ajay Devgan) आणि अमिताभ बच्चन एका नव्या सिनेमामध्ये एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे या सिनेमामध्ये अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण या सिनेमामध्ये पायलटची भूमिकाही करणार आहे. डिसेंबरमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'मेडे' असं या नव्या सिनेमाचं नाव आहे. अजय देवगण या सिनेमामुळे प्रचंड खूश आहे. कारण तो पहिल्यांदाच खुद्द अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. भुज द प्राइड ऑफ इंडिया या सिनेमाच्या कामामध्ये सध्या अजय देवगण व्यस्त आहे. त्या सिनेमाचं काम पूर्ण करुन तो मेडे सिनेमाच्या कामाला सुरुवात करणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अजय देवगण आणि अमिताभ बच्चन तब्बल 7 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.

अजय देवगण दिग्दर्शकाच्या खूर्चीत

अजय देवगणने या आधी ‘शिवाय’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. पण त्यातल्या अ‍ॅक्शन सीन्समुळे अजयचे फॅन्स खूप खूश झाले होते. आता ‘मेडे’ या फिल्ममध्ये अजय देवगणचं दिग्दर्शन प्रेक्षकांना आवडणार की ‘शिवाय’सारखीच या सिनेमाची गत होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 7, 2020, 4:54 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या