PHOTOS: नागराजसाठी बिग बी पोहोचले थेट शिक्षकाच्या घरी आणि...

शूटवेळी अमिताभ बच्चन हे शिक्षकांच्या घरी विसावा घेत असल्याचं दिसलं.

  • Share this:

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या बहुचर्चित हिंदी सिनेमाचं शूटिंग सध्या नागपुरात सुरू आहे.

या सिनेमातील एका सीनच्या शूटसाठी बिग बी अमिताभ बच्चन हे 'आपले विद्या मंदीर' या शाळेत फ़िज़िक्सचे शिक्षक असणाऱ्या चोबीतकर सर यांच्या घरी पोहोचले.

शूटवेळी अमिताभ बच्चन या शिक्षकांच्या घरी विसावा घेत असल्याचं दिसलं. अगोदर झुंडमधून बिग बी यांनी माघार घेतली होती. पण पुन्हा ते सिनेमाशी जोडले गेलेत. या सिनेमासाठी बिग बी सलग 45 दिवस शूटिंग करणार आहेत.

संपूर्ण सिनेमाचं शूटिंग शेड्युल 85 दिवसांचं असेल. पण असंही कळलंय, की कदाचित अमिताभ हे रोज मुंबई-नागपूर असा फ्लाइटनं प्रवास करतील. पण यात बदलही होऊ शकतो.

बिग बी वगळता सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट नवखी आहे. नागराज यांनी सिनेमात काम करणाऱ्या मुलांना आधीच प्रशिक्षण दिलंय.

या सिनेमाची कथा उनाड मुलांना एकत्र करून त्यांची फुटबॉल टीम तयार करणाऱ्या प्रशिक्षकांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

नागराज ह्यांनी बिग बी ह्यांनाच डोक्यात ठेवून ह्या सिनेमाची कथा लिहिली होती. अमिताभ ह्यांच्या होकारामुळे नागराजचं त्यांच्यासोबत सिनेमा करण्याचं स्वप्न पूर्ण होण्याची अशा पुन्हा जागृत झाली आहे. झुंड हा नागराज मंजुळेंचा पहिला हिंदी सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 02:54 PM IST

ताज्या बातम्या