Remix नंतर अमिताभ-रेखा यांच्या 'परदेसिया' गाण्याला भोजपूरी टच; काहीच तासांत VIDEO हिट

Remix नंतर अमिताभ-रेखा यांच्या 'परदेसिया' गाण्याला भोजपूरी टच; काहीच तासांत VIDEO हिट

प्रसिद्ध भोजपूरी स्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याने हे गाणं रिक्रियेट केलं आहे. तर गायिका शिल्पा राज सोबत त्याने प्लेबॅक केलं आहे.

  • Share this:

मुंबई 18 मे : 80 च्या दशकातील सर्वात हीट ठरलेलं गाण म्हणजे अभिनेते अभिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि रेखा (Rekha) यांच्या चित्रपटातील ‘परदेसिया’ (Pardesia)  हे गाणं. तर आजही या गाण्याची क्रेज कमी झालेली नाही. 1979 साली आलेल्या ‘मिस्टर नटवरलाल’ (Mister Natwarlal) या चित्रपटातील गाण्याने अनेकांच्या मनावर जादू केली होती. अजूनही हे गाणं ऐकलं जातं. तर आता या गाण्याला नवं रुप एका भोजपूरी गायकाने दिलं आहे.

प्रसिद्ध भोजपूरी स्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) याने हे गाणं रिक्रियेट केलं  आहे. तर गायिका शिल्पा राज सोबत त्याने प्लेबॅक केलं आहे. (Khesari Lal Yadav recreats pardesia song)

अक्षय कुमारच्या पहिल्या स्क्रीन टेस्टचा VIDEO VIRAL, 30 वर्षांनंतर त्याचीच रिअॅक्शन पाहा

‘सारेगमप हम भोजपूरी’ (Saregamapa Hum Bhojpuri)  या युट्युब चॅनल वर गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासातचं व्हिडीओ हीट ठरला आहे.

गाण्यात अमिताभ यांच्या ठिकाणी खेसारी लाल यादव स्वतः दिसत आहेत तर रेखा याच्या ऐवजी श्वेता मेहरा नृत्य करताना दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. गाण्यावरील हा नवा प्रयोग अनेकांना आवडला आहे. तर खेसारीलाल आणि श्वेता मेहरा यांच्या डान्सच्या तडक्याने गाण्याला आणखीनच रंगत चढली आहे.

या चिमुकलीला ओळखलं का? आज फक्त मराठी, हिंदीच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अवघ्या सात तासांत या व्हिडीओला 13 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहीलं आहे. तर 1.3 लाख लाइक्स मिळाले आहेत. अनेकांना हे गाणं फार आवडलं असून अनेकांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधीही खेसारीलाल याने काही गाण्याचं रिक्रियेशन केलं होतं. तर आता या गाण्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे. तेव्हा आता हे गाणं ओरिजनल गाण्याइतक हीट ठरत का पाहणं औतसुक्याचं ठरेलं.

Published by: News Digital
First published: May 18, 2021, 8:55 PM IST

ताज्या बातम्या