बॉलिवूडचा 'शहेनशहा' आणि टॉलिवूडचा 'इंद्रा' एकाच सिनेमात

बॉलिवूडचा 'शहेनशहा' आणि टॉलिवूडचा 'इंद्रा' एकाच सिनेमात

या सिनेमाचं नाव 'उय्यलवाडा नरसिंहा रेड्डी' आहे. हा सिनेमा कर्नूलच्या एका स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्यावर आधारित असेल.

  • Share this:

17 ऑगस्ट : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आणि तेलुगू सिनेमांचे सुपरस्टार चिरंजीवी आता एका सिनेमात काम करणार असून या सिनेमाची निर्मीती चिरंजीवीचा मुलगा राम चरण करणार आहे. या सिनेमाचं नाव 'उय्यलवाडा नरसिंहा रेड्डी' आहे. हा सिनेमा कर्नूलच्या एका स्वातंत्र्यसैनिकाच्या आयुष्यावर आधारित असेल.

या सिनेमाचं दिग्दर्शन सुरेंदर रेड्डी करणार आहेत. फिल्मच्या टीमने अमिताभ बच्चन यांनी ही फिल्म साईन केल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय. पण बिग बी कुठली भूमिका साकारणार याबाबत मात्र काहीही सांगितलेलं नाही. तसंच ए.आर. रेहमान या सिनेमाला संगीत देणार असल्याचीही सध्या चर्चा आहे. या सिनेमाचं पोस्टर 22 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

या सिनेमाचं बजेट 150 कोटी असेल असंही बोललं जातंय. या सिनेमाची निर्मिती हिंदी ,तेलुगू आणि कन्नडा या तीन भाषांमध्ये होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 05:26 PM IST

ताज्या बातम्या