अमिताभ-जया बच्चन पुन्हा सिनेमात एकत्र

अमिताभ-जया बच्चन पुन्हा सिनेमात एकत्र

सुजीत सरकार दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करतोय. 'पिंक'नंतर सुजीत सरकार दुसऱ्या सिनेमावर काम करतोय.

  • Share this:

17 मे :  अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बऱ्याच वर्षांनी एकत्र सिनेमात येतायत. सुजीत सरकार दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करतोय. 'पिंक'नंतर सुजीत सरकार दुसऱ्या सिनेमावर काम करतोय. त्यासाठी नवी कथाही शोधलीय.

40 वर्ष लग्न झालेल्या एका जोडप्याची गोष्ट आहे. सुजीत सरकारनं बिग बींना याबद्दल विचारलंही आहे. अजून सिनेमाचं नाव नक्की ठरलं नाहीय.

अमिताभ आणि जया बच्चन यांना खूप वर्षांनी एकत्र पाहायला लोक उत्सुक आहेत. जंजीर,अभिमान, मिली, सिलसिला हे दोघांचे सिनेमे हिट होते. त्यांचा शेवटचा एकत्र असलेला सिनेमा होता 'की अँड का'.

दोघांची शोलेमधली जोडी आजही एव्हरग्रीन मानली जाते. बाॅलिवूडमध्ये या दोघांबद्दल खूप आदरही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 02:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading