मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमित साध या तरुणीमुळं होता नैराश्येत; पैसे नव्हते म्हणून झालं होतं ब्रेकअप

अमित साध या तरुणीमुळं होता नैराश्येत; पैसे नव्हते म्हणून झालं होतं ब्रेकअप

नच बलियेमधून सुरू झालेलं नातं 8 वर्षानी बिग बॉसमध्ये येऊन संपलं; अशी होती अमित साधची लव्हस्टोरी

नच बलियेमधून सुरू झालेलं नातं 8 वर्षानी बिग बॉसमध्ये येऊन संपलं; अशी होती अमित साधची लव्हस्टोरी

नच बलियेमधून सुरू झालेलं नातं 8 वर्षानी बिग बॉसमध्ये येऊन संपलं; अशी होती अमित साधची लव्हस्टोरी

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 जून: ‘काय पो छे’ (Kai Po Che) या चित्रपटातून नावारुपास आलेला अमित साध (Amit Sadh) हा बॉलिवूडमधील सध्याच्या अपकमिंग स्टार्सपैकी एक म्हणून चर्चेत आहे. जबरदस्त अभिनय आणि अफलातून टाईमिंगच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये लहानमोठ्या भूमिका साकारुन करिअरची सुरुवात करणारा अमित सध्या बिग बजेट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसतो. परंतु फिल्मी करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेला अमित वैयक्तिक आयुष्यात मात्र एकटा पडलेला आहे. ब्रेकमुळं तो नैराश्येत देखील गेला होता. (Amit Sadh love story with Neeru Bajwa) नच बलियेच्या सेटवर सुरु झालेली त्याची लव्हस्टोरी बिग बॉसच्या घरात संपली.

अमितचा आज वाढदिवस आहे. 38व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. विशेषत: तरुणींमध्ये अमितची खूप क्रेझ आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देखील कित्येक फिमेल फॅन्सनी त्याला प्रपोज केलं. परंतु लाखो तरुणी ज्याच्यासाठी वेड्या आहेत तो अभिनेता अभिनेत्री नीरु बाजवाच्या प्रेमात वेडा होता. जवळपास आठ वर्ष ते दोघं एकमेकांना डेट करत होते. परंतु बिग बॉसच्या घरात त्यांच्या नात्याचा शेवट झाला.

बिग बी ते गोविंदा... विपरीत परिस्थितीवर मात करुन या कलाकारांनी मिळवलं यश

2010 साली टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अमितनं आपल्या ब्रेकअपचं कारण सांगितलं होतं. रिलेशनशिपमध्ये असताना तो केवळ 22 वर्षांचा होता. त्याचं करिअर सेट नव्हतं. तो काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. परंतु नीरुला आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर असलेला एक व्यक्ती हवा होता. त्यामुळं दोघांमध्ये सतत मतभेद व्हायचे. या मतभेदांमुळंच दोघांचं ब्रेकअप झालं. विशेष म्हणजे अमित बिग बॉसच्या घरात असताना त्याला त्याच्या ब्रेकअपची माहिती मिळाली. या ब्रेकअपमुळं तो नैराश्येत देखील गेला होता. बिग बॉसमधील इतर स्पर्धक त्याला क्राईंग बेबी म्हणून चिडवायचे. परंतु प्रेयसीसाठी रडणारा तोच अमित आज बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो.

First published:

Tags: Bollywood actor, Entertainment, Love story