मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

श्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट

श्वेता बच्चनसाठी आमिर खान लिहायचा पत्र; अभिषेक बच्चनने केला गौप्यस्फोट

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या चॅट शोमध्ये अभिषेकने बहीण श्वेताशी संबंधित अनेक गुजगोष्टी केल्या आहेत.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या चॅट शोमध्ये अभिषेकने बहीण श्वेताशी संबंधित अनेक गुजगोष्टी केल्या आहेत.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या चॅट शोमध्ये अभिषेकने बहीण श्वेताशी संबंधित अनेक गुजगोष्टी केल्या आहेत.

मुंबई, 14 जानेवारी : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा (Shweta Bachchan Nanda) ही रुपेरी पडद्यापासून लांब असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते असून तिचे अनेक फोटो समोर येत असतात. बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरीदेखील ती बॉलिवूडमधील आमीर खान(Aamir Khan) आणि सलमान खान (Salman Khan) या दोन अभिनेत्यांची मोठी फॅन आहे. याबाबत नुकतंच अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) याने भाष्य केलं आहे. याबाबत आमिर खानला जेव्हा कळंलं तेव्हा त्याने श्वेताला पत्र लिहिण्यास सुरुवात केल्याचे अभिषेकने सांगितलं आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या चॅट शोमध्ये अभिषेकने बहीण श्वेताशी संबंधित अनेक गुजगोष्टी केल्या आहेत.  सलमान खानचा (Salman Khan) ‘मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती. तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट ऑडीओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ती ऐकायची. याचबरोबर सलमानचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिने अभिषेक बच्चनकडून फ्रेंड लिहिलेली कॅप देखील मागितली असल्याची माहिती अभिषेक बच्चन याने या शोमध्ये दिली होती. यावेळी श्वेता हिनेदेखील आम्हाला चित्रपट पाहण्यास बंदी असल्याने मी हा चित्रपट रेकॉर्ड करून पाहिल्याचं सांगितलं. ती सलमानची मोठी चाहती असल्याचं देखील तिने यावेळी सांगितलं.
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

याचबरोबर आमिर खान याची देखील चाहती असल्याचे तिने या कार्यक्रमात सांगितले. यावेळी अभिषेकने सांगितलं की, श्वेता अभिनेता आमिर खानची देखील फॅन होती. जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा. आमिर खान आणि श्वेता बच्चन यांचा वाढदिवस लागोपाठ असल्याने तो मला पत्र लिहीत असावा हे देखील एक कारण तिने यावेळी सांगितले. आमिर खानचा वाढदिवस 14 मार्चला आणि श्वेता बच्चन हिचा वाढदिवस 17 मार्चला असतो. अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) लवकरच आपल्या चाहत्यांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. बिग बुल(Big Bull) असे त्याच्या चित्रपटाचे नाव असून यामध्ये त्याच्याबरोबर चंकी पांडे (Chunky Pandey) आणि इलियाना डिक्रुझ (Ileana D'Cruz) देखील दिसणार आहे.
First published:

पुढील बातम्या