मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पाणी फाऊंडेशनच्या मदतीसाठी आमिर खान शरद पवारांच्या भेटीला

पाणी फाऊंडेशनच्या मदतीसाठी आमिर खान शरद पवारांच्या भेटीला

आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचं काम सध्या जोरात सुरु आहे, त्याचसंदर्भात आमिर खानने शरद पवार यांची भेट घेऊन पाणी फाऊंडेशनच्या कामाची माहिती दिली.

18 मे : आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचं काम सध्या जोरात सुरु आहे, त्याचसंदर्भात आमिर खानने शरद पवार यांची भेट घेऊन पाणी फाऊंडेशनच्या कामाची माहिती दिली. यावेळी आमिरच्या पाणी फाऊंडेशनचं शरद पवारांनी भरभरुन कौतुक केलं.

पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचं कौतुकास्पद काम त्यांची टीम करत असल्याचं ते म्हणाले. यापूर्वीही पाणी फाऊंडेशनच्या या कामासाठी मी माझ्या खासदार निधीतून तसेच राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून काही आर्थिक मदत केली आहे. यापुढेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती करायची माझी तयारी आहे, असंही यावेळी पवार म्हणाले.

आपल्या देशात ऋतूमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम आमिर खान यांची टीम करत आहे. केवळ पिण्यासाठी पाणीसंवर्धन नाही तर ६० टक्के शेतीवर अवंलबून असलेल्या देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

त्यामुळे फक्त पाण्याचा दुरुपयोग करण्यापेक्षा पाण्याच्या संवर्धनासाठी तुम्ही आम्ही, आपण सगळे पुढे सरसावलो पाहिजे, कारणा पाणी ही काळाची गरज आहे.

First published:

Tags: Amir khan, Pani foundation, Sharad pawar, आमिर खान, पाणी फाऊंडेशन, शरद पवार