मुंबई, 22 ऑगस्ट : बॉलिबूडच्या स्टार किड्सबद्दल नेहमी चर्चा असते. आता तर सुपरस्टार खान आणि कुमार यांची मुलं टीनएजर आहेत. त्यामुळे त्यांच्या बॉलिवूड पदार्पणाची, त्यांच्या पार्ट्यांची, लाइफस्टाइलची सोशल मीडियावर चर्चा असते. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. तिनेच शेअर केलेल्या काही इन्स्टाग्राम पोस्टमधून आणि स्टीरीमधून तिच्या रिलेशनशिपबद्दल गॉसिप सुरू झालं. इरा आमिर खान काही दिवसांपासून मिशाल कृपलानीला डेट करत आहे. इराने इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा मिशालबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. तो फोटो व्हायरल झाला आणि त्याबरोबर त्याच्या कॅप्शनवरून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत.
इराने या फोटोखाली कॅप्शन लिहिली आहे. त्यात म्हटलं आहे - 'सगळं ठीक होईल' यावरून आमिर आणि इराचे फॅन्स आणि हितचिंतक वेगवेगळे तर्क लावत आहेत. नेमकं काय झालं. सगळं ठीक आहे ना, असं इन्स्टा युजर्स विचारत आहेत.
संबंधित : आमिर खानच्या मुलीने केलं हॉट फोटोशूट, स्वतःलाच पाहून म्हणाली, ‘तू कोण आहेस’ शिवाय इराने या कॅप्शनबरोबरच #existentialcrisis आणि #acceptance असे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यामुळे नेमकी काय गडबड आहे. कुणाला स्वीकारण्यासाठी संघर्ष सुरू आहे यावरही तर्क लढवण्यात येत आहेत. यापूर्वीही इराने मिशालबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. त्यांचा रोमँटिक डान्स व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये आमिर खाननं इरा आणि जुनैत दोघंही बॉलिवूड पदार्पण करू इच्छित असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासून इराच्या आणि जुनैदच्या सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग वाढलं आहे. मुलगा जुनैदला अभिनेता व्हायचं आहे तर इराला मात्र फिल्म मेकिंगमध्ये रुची आहे. इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. मागील वर्षी रमजानच्या काळात इरासोबत शेअर केलेल्या एका फोटोमुळे आमिरला टीका सहन करावी लागली होती.
हे वाचा - अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण!
-------------------------
मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर