सलमानच्या वाढदिवसाला शाहरुख आणि आमिरच्या हटके शुभेच्छा!

सलमानच्या वाढदिवसावर शाहरुखनं त्याच्यासाठी गाणं गायलं. बरं इतकंच नाही तर त्याने सलमानच्या 'टायगर जिंदा है' या सिनेमाचं भरभरुन कौतुकही केलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 02:03 PM IST

सलमानच्या वाढदिवसाला शाहरुख आणि आमिरच्या हटके शुभेच्छा!

28 डिसेंबर : दबंग खान सलमानचा काल 52वा वाढदिवस खूप जोरदार साजरा झाला. त्यात अभिनेता शाहरुख खाननेही सलमानला अगदी खास स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या. सलमानच्या वाढदिवसावर शाहरुखनं त्याच्यासाठी गाणं गायलं. बरं इतकंच नाही तर त्याने सलमानच्या 'टायगर जिंदा है' या सिनेमाचं भरभरुन कौतुकही केलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, एका कार्यक्रमात शाहरुखनं सलमासाठी 'तुम जियो हजारो साल' हे गाणं गायलं. त्याचबरोबर त्याला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा देत शाहरुखने तो खूप खूप यशस्वी होवो अशी प्रार्थना केली.

इकडे अभिनेता आमिर खाननेही भाईजानला अगदी हटके स्टाईलमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमिरनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन सलमानला शुभेच्छा दिल्या. सलमानच्या 'टायगर जिंदा है' च्या यशासाठी त्याला अभिनंदन केलं. त्यात आमिर म्हणाला की, 'तुझा आजचा दिवस चांगला जावो हीच प्रार्थना. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सिनेमा सुपरहिट झाल्याबद्दल अभिनंदन.'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...