मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भर पावसाळ्यात अमेयला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, हे खाऊ का ते... म्हणत पडला धर्मसंकटात?

भर पावसाळ्यात अमेयला लागलेत 'या' पदार्थाचे डोहाळे, हे खाऊ का ते... म्हणत पडला धर्मसंकटात?

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) याला कधी काय सुचेल आणि करावंस वाटेल याचा नेम नाही. या अभिनयातील वाघाला जे पाहिजे ते तो करून दाखवतोच असा त्याचा हटके अंदाज राहिला आहे. पण आज त्याने केलेल्या अजब मागणीमुळे तो प्रचंड चर्चेत आला आहे.

  मुंबई 11 जून: अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आपल्या अचाट विनोदबुद्धीमुळे कायमच सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होत असतो. अमेय वाघचं करिअर (Amey Wagh Career) सध्या सुपरफास्ट धावत आहे. एकाहून एक दर्जेदार कलाकृतीतून अमेय प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. अमेयचा चौकसपणा आणि नेमक्या वेळी जमून येणारं टायमिंगयामुळे तो कायम नावाजला जातो. सध्या अमेयने केलेल्या एका पोस्टमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. यात त्याने एका अजब गोष्टीची माहिती दिली आहे.  अमेयचा विनोदी सेन्स कधी जागा होईल हे सांगणं अवघड आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटकडे सुद्धा (Amey Wagh Instagram) लोक आकर्षित होतात. त्याला कारण त्याच्या भन्नाट कॅप्शन. अमेयचे फोटो आणि कॅप्शन याचा दूरवर काहीच संबंध नसतो पण त्या कॅप्शन इतक्या रंजक असतात की हसू आवरणं कठीण होऊन जातं. सध्या पावसाळ्याचे वेध लागले असताना भर जून महिन्यात त्याला आंबे खावेसे वाटत आहेत. आता ही काय अजब मागणी आणि हौस आहे? साधारणपणे उन्हाळ्यात आंब्याचा सीजन असतो. जून महिना कॅलेंडरमध्ये लागला की शेवटचे आंबे पाहायला मिळतात आणि हा फळांचा राजा पुन्हा वर्षभर दिसत नाही. अशात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अमेयला आंबे खायचे डोहाळे लागले आहेत असं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून दिसून येत आहे.  हा गोंधळ अमेयच्या नुकत्याच टाकलेल्या फोटोमुळे होत आहे. अमेयने एक खास फोटो शेअर करत त्याला भन्नाट कॅप्शन दिली आहे. तो लिहिती,”आज खूप मोठा प्रश्न पडलाय ! मँगो मस्तानी खावी की मँगो icecream ? 💛 #waghchaswag #mangoseasonisntoveryet” 
  View this post on Instagram

  A post shared by Amey Wagh (@ameyzone)

  त्याचा हा पिवळा आऊटफिट बघून थेट आंब्याची आठवण येते असा भास होत असल्याने त्याने ही भन्नाट कॅप्शन फोटोखाली दिली आहे. यात आवर्जून एक हॅशटॅग टाकत तो म्हटला आहे की आंब्याचा सीजन अजून संपला नाही. बहुधा खऱ्या आंब्यानंतर हा पिवळा आंबा या सिजनचा शेवटचा आंबा ठरणार असं दिसत आहे. हे ही वाचा- कुशल बद्रिकेकडून तेजस्विनी पंडित ते ' Raanbazaar' दिग्दर्शकाचं तोंडभरून कौतुक, पण प्राजक्ता माळीसाठी एक शब्दही नाही यावर अनेकांनी त्याला सुंदर कमेंट करून त्याच्या विनोदबुद्धीच कौतुक केलं आहे. बऱ्याच जणांनी त्याला प्रेमाने ‘आंबावडी’ सुद्धा म्हणलं आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या