02 जुलै : 'दिल दोस्ती दुनियादारी' आणि 'मुरांबा' चित्रपटातून तरुणींचं मन जिंकलेला अमेय वाघ लग्न बेडीत अडकलाय. अमेयने आपली प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाह केलाय. पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
अमेय वाघ आणि त्याची प्रेयसी साजिरी देशपांडे हे गेल्या 13 वर्षांपासून प्रेमात होते. काही दिवसांपूर्वीच अमेयने गेल्या १३ वर्षांपासून साजिरी आपल्याला सहन करत आली आणि यापुढेही आपण असंच आनंदी राहू शकतो असा विश्वास आहे, असं सांगत अमेयने साजिरीसोबतच्या लग्नाची बातमी दिली होती. आज पुण्यातील श्रुतिमंगल कार्यालयात अमेय आणि साजिरीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा