Elec-widget

अमेरिकन महिलेनं केला प्रियांका चोप्राचा अपमान, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अमेरिकन महिलेनं केला प्रियांका चोप्राचा अपमान, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अमेरिकन चाहते हे भारतीय चाहत्यांपेक्षा जास्त सभ्य असल्याचं प्रियांकानं म्हटलं होतं ज्यामुळे भारतीय चाहते नाराज झाले होते.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर : सध्या ग्लोबल स्टार झालेली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा होते तर कधी निकसोबतचं तिचं खास बॉन्डिंगची. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अमेरिकन चाहते हे भारतीय चाहत्यांपेक्षा जास्त सभ्य असल्याचं प्रियांकानं म्हटलं होतं ज्यामुळे भारतीय चाहते नाराज झाले होते आणि यावरुन तिला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं. पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच एका अमेरिकन महिलेनं सर्वांसमोर प्रियांकाचा अपमान करत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर सध्या प्रियांका चोप्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मिस धालीवाल नावाच्या एका महिलेनं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती महिला एक मासिक कचऱ्याच्या डब्यात फेकताना दिसत आहे. या मासिकावर प्रियांका चोप्राचा फोटो आहे. हा व्हिडीओ शेअर करताना या महिलेनं लिहिलं, ‘हे मासिकआज माझ्या घरी आलं. मी विचार केला रिसायकलिंग न करता जर मी हे अशा ठिकाणी फेकलं तर ते जास्त चांगलं होईल.’ त्या महिलेनं प्रत्यक्षात असं केलं सुद्धा आणि एवढं करुन ती थांबली नाही तर तिनं हा व्हिडीओ तिच्या ट्विटर हँडलवर शेअर केला.

सलमान खाननं खरंच रानू मंडल यांना दिलं 55 लाखांचं घर? वाचा काय आहे सत्य

अमेरिकन लोकांकडून प्रियांकाला ट्रोल करण्याची किंवा तिचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. निक प्रियांकाच्या लग्नानंतरही एका अमेरिकन मासिकानं प्रियांकानं लग्नासाठी निकवर दबाव टाकल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी हे दोघं लवकरच घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याच आणखी एका मासिकानं म्हटलं होतं. मात्र दोन्ही वेळी निकच्या कुटुंबीयांनी या सर्व अफवा असल्याचं सांगत ही वृत्त फेटाळली होती. तसेच हे असं सतत घडत राहिल्यास आम्हाला यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल असंही त्यांनी म्हटलं होतं.

प्रभासच्या 'साहो'वर अभिनेत्री लिसा रेनं केले गंभीर आरोप, म्हणाली...

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रियांकाचा पती निक जोनसच्या एका फोटाला ट्रोल केलं जात होतं. ज्यात निक त्याचे भाऊ जो आणि केविन यांच्यासोबत दिसत होता. जो आणि केविन हे आपापल्या पत्नींना किस करत होते तर निक या फोटोमध्ये एकटाच उभा असलेला दिसला. त्यामुळे सोशल मीडियवर या फोटोची खिल्ली उडवली गेली. हे प्रियांकाला सहन झालं नाही आणि तिनं हा फोटो मॉर्फ करत त्याठिकाणी निकसोबत स्वतःचा कान फेस्टिव्हल वेळचा फोटो चिटकवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. या फोटोला तिनं ‘मी नेहमीच तुझ्या सोबत आहे निक जोनस’ असं कॅप्शन दिलं होतं.

...म्हणून सलमान खानने स्वतःला मारून घेतले चाबकाचे फटके, पाहा VIDEO

====================================================================

नाशिक मार्गावर कार-दुचाकीची धडक, बर्निंग बाईकचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 09:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...