Home /News /entertainment /

सुशांतला मारण्यासाठी स्टनगनचा वापर? डॉक्टरच्या दाव्याने खळबळ

सुशांतला मारण्यासाठी स्टनगनचा वापर? डॉक्टरच्या दाव्याने खळबळ

सुशांत सिंह राजपूतला स्टनगनने मारण्यात आले असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

    मुंबई, 13 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने दिनांक 14 जून 2020 रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये देखील सुशांतच्या मृत्यूचे कारण आत्महत्या सांगण्यात आले होते. त्यानंतर अनेक दावे सुशांतच्या मृत्यूबाबत करण्यात येत आहेत. मात्र सुशांतला स्टनगनने मारण्यात आले असा दावा देखील केला जात आहे. विशेष म्हणजे या दाव्याला भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी देखील पाठिंबा दिली आहे. एका डॉक्टरने याबाबत त्याचे मत सोशल मीडियावर मांडले आहे. अमेरिकेतील इंटर्नल मेडिसीन डॉक्टर राजू बाधवा यांनी यासंदर्भात दावा केला आहे. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान या अहवालानुसार बाधवा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'सुशांतच्या प्रकरणात स्टनगनचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या गळ्यावर जळाल्याच्या खुणा होत्या. त्याची एक बाजू पॅरलाइज झाली होती. हाय वोल्टेजमुळे एक भाग पॅरलाइज होतो. चेहऱ्याचा डावा भाग पॅरलाइज झाल्यामुळे त्याचा डावा डोळा उघडा होता. शॉकमुळे हा डोळा बंद नव्हता' (हे वाचा-VIDEO : सुशांतच्या बहिणीने हात जोडले, म्हणाली- सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे) त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'अमेरिकेत नौदलाच्या अधिकाऱ्याला मारण्यासाठी अशाप्रकारेच स्टन गनचा वापर केला गेला होता आणि ती आत्महत्या भासवण्यात आली होती. पण फॉरेन्सिक चाचणीत खुलासा झाल्यानंतर मारेकऱ्याला पकडले होते.' दरम्यान याप्रकरणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील एनआयएने यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ही स्टनगन अरबी समुद्रातून आपल्या देशात आणली का असा सवाल त्यांनी केला आहे. (हे वाचा-रियामुळे कोल्हापूरच्या व्यक्तीला सहन करावा लागतोय शिवीगाळ, वाचा काय आहे कारण) आज सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणातील सर्व पक्ष लेखी युक्तिवाद सादर करतील. या प्रकरणाची चौकशी सीबीआय करेल की मुंबई पोलीस यावर न्यायालयाचा निर्णय येणे बाकी आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्तीने सीबीआयने नोंदवलेली एफआयआर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. तर बिहार सरकार आणि सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी याला विरोध दर्शविला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या