बिहारमध्ये माझ्यावर बलात्कार झाला असता; प्रचारावरुन परतलेल्या अमिषा पटेलचा गौप्यस्फोट

बिहारमध्ये माझ्यावर बलात्कार झाला असता; प्रचारावरुन परतलेल्या अमिषा पटेलचा गौप्यस्फोट

“बिहारमध्ये माझ्यावर बलात्कारही झाला असता” असा गंभीर खुलासा अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel)ने केला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: बिहारमध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठी नेत्यांसोबतच अभिनेतेदेखील बिहारमध्ये जात आहेत. अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel)ही प्रचारासाठी बिहारमध्ये गेली होती. लोकजनशक्ती पक्षा (LJP)चे उमेदवार डॉक्टर प्रकाश चंद्र यांच्या प्रचारासाठी अमिषा बिहारमध्ये गेली होती. अमिषा आता मुंबईत परतली आहे. पण बिहारमध्ये निवडणूक प्रचारासाठी आलेला अनुभव अत्यंत वाईट होता असं तिने सांगितलं आहे.

"प्रकाश चंद्र यांनी मला बळजबरीने प्रचाराच्या गर्दीत पाठवलं" असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, "तिथे माझ्यावर बलात्कारच झाला असता" असा आरोपही तिने केला आहे. बिहारमधील प्रचाराचा अनुभव सांगतां ती म्हणाली की “हे भयाक स्वप्न होतं असंच मला वाटत आहे. मी प्रचंड घाबरले होते. मी आणि माझ्यासोबत असलेल्या टीमला लवकरात लवकर मुंबईत परतायचं होतं. LJPउमेदवार प्रकाश चंद्रा हा अत्यंत वाईट माणूस आहे, त्याने मला धमक्या दिल्या, ब्लॅकमेल केलं असा आरोप अभिनेत्री, मॉडेल अमिषा पटेल हिने केला आहे. “असा माणूस निवडणूक जिंकून आला तर महिलांशी कसं वर्तन करेल” असा सवालही तिने उपस्थित केला आहे.

"मला बळजबरीने प्रचार करायला भाग पाडलं"

बिहारमध्ये डॉ. प्रकाश चंद्रा यांनी मला बळजबरीने प्रचार करायला सांगितलं. प्रचारासाठी मला ब्लॅकमेल करण्यात आलं, धमक्या देण्यात आल्या असा आरोप अभिनेत्री अमिषा पटेल हिने केला आहे. ती बिहारला गेली तेव्हा तिला सांगण्यात आलं होतं की पाटण्याजवळ तिला प्रचार करायचा आहे. पण पाटण्यापासून मला खूप लांब असलेला अबोरा गावात नेण्यात आलं असं अमिषा म्हणाली. “माझ्या नियोजित कार्यक्रमानंतर मला मुंबईत परतायचं होतं पण तिथल्या LJPच्या उमेदवारांनी मला गावात एकटं सोडून प्रचार करण्यास भाग पाडलं.” आता अमिषाच्या आरोपांनंतर प्रकाश चंद्रा यांच्या भवितव्यावर काय परिणाम होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 28, 2020, 7:30 PM IST

ताज्या बातम्या