मुंबई, 11 जानेवारी: Amazon Prime Video हा भारतात लोकप्रिय झालेला OTT प्लॅटफॉर्म आहे. यामुळेच प्राइम व्हिडिओवर अनेक मोठ्या निर्मात्या कंपन्यांचे चित्रपट (Films) आणि वेब सीरीज (Web Series) प्रदर्शित केल्या जातात. 'तांडव' आणि 'फॅमिली मॅन 2' सारख्या सीरीज लवकरच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. पण आज अॅमेझॉन प्राइम व्हिडिओनं असं पाऊल उचललं आहे की, ज्यामुळे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले आहेत.
प्राइम व्हिडिओने आपल्या लोगोसोबतच प्राइम व्हिडिओ (Prime Video) या शब्दातही फेरबदल केला आहे. कंपनीने प्राइम (Prime) या इंग्रजी शब्दातून एम (M) आणि ई (E) अक्षरं काढली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या इंट्रोमधूनही ME गायब केलं आहे.
View this post on Instagram
प्राइम व्हिडिओच्या इंट्रोमध्ये इंग्रजीत 'Fairy tale comes to life' असं लिहिलेलं आहे. या शब्दांतीलही M आणि E ही अक्षरं देखील काढून टाकण्यात आली आहेत. प्राइम व्हिडिओच्या इंट्रोमध्ये आता 'Fairytale comes to life' या शब्दांऐवजी केवळ 'Fairytale co s to life' असं दिसत आहे. प्राइम व्हिडिओने M आणि E गायब केल्यामुळे दर्शकही आश्चर्यचकित झाले आहेत. आता त्यांनी काही चित्रपटाशी संबंधित मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये M आणि E ही अक्षरं गायब आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने या पोस्टसोबतच #WhereIsME हॅशटॅग सुरु केला आहे. त्यामुळं लोकही सोशल मीडियावर त्यासंदर्भात पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. तसेच दर्शकांकडून आपल्या कल्पनेचे घोडे दौडत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत.
View this post on Instagram
काही लोकांनी यावर प्रतिक्रिया देत, प्राइम व्हिडिओवर एक नवीन प्रकल्प रिलीज होणार असल्याचं म्हणत आहेत. M आणि E गायब होणं याच प्रकल्पाचा भाग असल्याचा दावाही नेटकरी करत आहेत. प्राइम व्हिडिओशी संबंधित पोस्टवर लोकं बरेच मजेदार कमेंट्सही करत आहेत.
View this post on Instagram
आता लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून, M आणि E गायब होण्यामागच्या कारणाचा खुलासा कधी होणार हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.