Home /News /entertainment /

अमेयने मराठीत वाचलं इरफानचं ‘ते’ पत्र, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

अमेयने मराठीत वाचलं इरफानचं ‘ते’ पत्र, VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननं सर्वांचा निरोप घेतला. न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरनं तो मागच्या 2 वर्षांपासून आजारी होता. 2018 मध्ये त्याला या कॅन्सरचं निदान झालं होतं.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननं सर्वांचा निरोप घेतला. न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरनं तो मागच्या 2 वर्षांपासून आजारी होता. 2018 मध्ये त्याला या कॅन्सरचं निदान झालं होतं.

अमेय वाघने इरफान खान याच्यासोबत बिल्लू बार्बर या चित्रपटात काम केलं आहे.

    मुंबई, 29 एप्रिल : हरहुन्नरी कलाकार, आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारा, प्रेक्षकांशी अनोखा आणि भावनिक ऋणाणूबंध असलेला इरफान खान (Irrfan Khan) आज काळाच्या पडद्याआड केला.  काही दिवसांपूर्वी इरफानच्या आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं. आईच्या मृत्यूनंतर तो अधिकच खचला होता. काही कलाकार हे केवळ चित्रपटापुरते सीमित राहत नाहीत. तर ते तुमच्या आयुष्याचा भाग बनतात. इरफान हा त्यापैकी एक होता. अभिनेता इरफान खानने दोन वर्षांपूर्वी आजाराचं निदान झाल्यानंतर चाहत्यांसाठी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र अभिनेता अमेय वाघने (Amey Wagh) मराठीत वाचून दाखवलं. 'बिल्लू बार्बर' या सिनेमात अमेयला इरफान खानसोबत काम करायची संधी मिळाली. कलेतून क्रांती करणारे फार मोजके असतात असं म्हणत अमेय वाघने या व्हिडिओमधून इरफान खानला श्रद्धांजली वाहिली. हे पत्र इरफानने इंग्रजीतून लिहिले होते. अमेय वाघ याने त्याचा मराठीत अनुवाद केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून अमेयने इरफानला श्रद्धांजली अर्पण करीत त्याचे वाचन केले. 2018 साली इरफानंला आपल्या या कॅन्सर आजाराविषयी कळलं होतं. त्याने या संदर्भात स्वत: आपल्या फॅन्सना सोशल मीडियावरून माहिती दिली होती. त्यानंतर लंडनमध्ये रुग्णालयात उपचार घेऊन 2019 साली भारतात पुन्हा आले. इरफान खानला न्युरो इंडोक्राईन ट्युमर नावाचा आजार झाला होता. आपल्या दर्जेदार अभिनयाने भूमिकांना वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी अभिनेता अशी इरफान खानची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणारे आज काळाच्या पडद्याआड झाला आहे. बॉलिवूडमधील आणखी एक तारा निखळल्यानं शोककळा पसरली आहे. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला आहे.  त्याची एग्झिट सर्व जनतेसाठी चटका लावणारी आहे. दर्जेदार अभिनयाबरोबरच विविध सामाजिक विषयांवर मत व्यक्त करायला तो कधी घाबरला नाही. त्याचा प्रामाणिकपणा आणि कामाप्रती त्याची निष्ठा डोळ्यातून दिसायची. दुर्देवाने यापुढे अशा सर्वांचं आयुष्य व्यापून टाकलेल्या कलाकाराला पडद्यावर पाहता येणार नाही, ही खंत त्याचे चाहते व्यक्त करीत आहेत. हे वाचा - 'मकबूल'ला शेवटचा निरोप, लॉकडाऊनमुळे मोजका मित्रपरिवार उपस्थित

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या